ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

अहमदनगर: दुध भेसळ रोखावी या मागणीसाठी जगदंबा देवी मंदिरात आमरण उपोषण


कर्जत :महाराष्ट्र राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनकडून दोन वेळा दूध संकलन करावे व दुधात पामतेल आणि पावडरची भेसळ रोखावी या मागणीसह इतर मागण्यासाठी राशीन येथील उदोजक नारायण तात्याबा जगताप यांनी राशीन येथील प्रसिद्ध जगदंबा देवी मंदिरात दोन दिवसापासून अमरण उपोषण सुरू केले आहे.


नारायण जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार दोनवेळा दूध संकलन करून शोतक-यांच्या दारात गाडी न नेता एकाच जागेवर दूध संकलन करण्यात यावे तरच दूधातील भेसळ रोखता येईल दूध भेसळीबाबतीत कितीही कायदे केले तरीसुद्धा फरक पडत नाही. कारण कायदे करून उपयोग नाही या कायद्यानुसार अधिकारी वर्गाचे हप्ते मात्र वाढलेले आहेत. या बाबतचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, दुग्ध विकास मंत्री, खा. सुजय विखे पाटील, आमदार रोहित पवार, जिल्हाधिकारी यांना पाठविले आहेत.


पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात प्रसिद्ध असणारे यमाई माता जगदंबा देवी संस्थानची सरकारी रेकॉर्ड प्रमाणे मोजणी करण्यात यावी, बापूराव जगताप, बबन जंजीरे, हरिश्चंद्र काळे, दत्तोबा जगताप यांनी ४१ गुंठे जमिन खरेदी केली होती. या ४१ गुंठे व्यतिरिक्त राजे भोसले यांच्या कडून इतरही लोकांनी कोणतीही जमीन खरेदी केली नाही. असे असतानाही ४१गुंठ्या ऐवजी ६५गुंठे जमीन आपआपसात वाटप करून घेतली.

त्यामुळे फेरफार नं ५६८४ हा रद्द करण्यात यावा. तर यशोदामैय्या ग्रामीण बिगर शेती पतसंस्था कोणाची तक्रार नसताना आवसनात काढली त्यांची चौकशी करून दोषी अधिकार्यानवर कारवाई करावी. तसेच सरकारी अधिकारी पदाधिकारी पैसे खातात त्यांना मरे पर्यंत कारावासाची शिक्षा मिळावी. अशी अपेक्षा निवेदनात ून करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !
Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !