ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Ahmednagar: कर्जत तालुक्यातील कंपनीला भीषण आग,एक कोटी रुपयांचे नुकसान

कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथील प्रविण अॅग्रो कोल कंपनी मध्ये बुधवार दिनांक ४ रोजी दुपारी १ च्या दरम्यान शाॅकसर्किट ने आग लागली .

Ahmednagar : कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथील प्रविण अॅग्रो कोल कंपनी (Pravin Agro Coal Company) मध्ये बुधवार दिनांक ४ रोजी दुपारी १ च्या दरम्यान शाॅकसर्किट ने आग लागून ब्रिकेट मशीन सह इतर साहित्य जळून खाक झाले.

कंपनीला आग कशी लागली ?

या निमगाव डाकू येथील शेतकरी गोरख इंगळे व प्रविण इंगळे यांनी दहा वर्षांपासून प्रविण अॅग्रो कोल कंपनी चालवित आहेत. या कंपनीमार्फत ते पुणे, नगर व कुमकुम येथील एमआयडीसी ला बाॅयलर साठी लागणारे ब्रिकेट पुरविण्याचे काम या कंपनी मार्फत करीत आहेत.

नगर सोलापुर महामार्ग वर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर 20 जण गंभीर जखमी


या कंपनीचे संचालक प्रविण इंगळे हे पुणे येथे गेले होते तर गोरख इंगळे हे जामखेड येथे लग्नाला गेले होते. दुपारी अचानक शाॅकसर्किट होऊन कंपनीत अचानक आग लागून पेट घेतला वा-यामुळे आगीने मोठ्या प्रमाणात आग लागली या आगीचे लोळ भयंकर आग ओकत असल्याने कुणालाही जवळ जाता येत नसल्याने आग सर्वत्र पसरत होती. इंगळे पिता पुत्रांना ही वार्ता कळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आगीने बरेच भस्म केले होते. कर्जत नगर पंचायत, करमाळा नगरपरिषद चे अग्निशमक बंब दाखल झाले त्यांनी आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण फारसे यशस्वी होऊ शकले नाहीत.

१ कोटी रुपयांचे नुकसान 

या आगीत ब्रिकेट मशीन सह बग्याज, कच्चे साहित्य याशिवाय तयार झालेले ब्रिकेट यासह शेडचे मोठ्या प्रमाणात जळून गेल्याने मोठे नुकसान झाले. प्रवीण इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार एक कोटी दहा लाख रुपये चे नुकसान झाले आहे. आगीची माहिती समजताच आमदार रोहित दादा पवार यांच्या कार्यालयातील कर्मचारी संजय महस्के यांनी कर्जत, करमाळा, जामखेड व आष्टी तालुक्यातील अग्निशामक यंत्रणा यांना सुचना देऊन तातडीने आग विझविण्यासाठी रवाना केल्या तर शिवाजी फाळके व सचिन घुले यांनी घटनास्थळी दाखल होवून इंगळे कुटूंबाला धीर दिला.

Karjat: उसाची तोड होत नसल्याने शेतकऱ्यावर ऊस जाळण्याची वेळ


या आगीत बग्याज, मळी, चिंचा पालापाचोळा, लाकडाचा भुसा या कच्चा मालापासून पक्के ब्रिकेट बनविले जाते हे पक्के ब्रिकेट एमआयडीसी तील कंपन्यांना लागत असते या आगीत ब्रिकेट मशीन सह कच्चा माल मोठ्या प्रमाणात जळीत झाले.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा .

Leave A Reply

Your email address will not be published.

Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !
Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !