ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

अहमदनगर: गाळपाविना मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक ; आ.पवारांनी दिशाभूल करू नये.— डाॅ.सुनील गावडेकर्जत , जामखेड तालुक्यातील अनेक शेतक-यांचा ऊस आजही शेतात उभा असताना लोकप्रतिनिधी मात्र दोन्ही तालुक्यातील संपुर्ण ऊस गाळप केल्याचे सांगुन ऊस उत्पादक शेतक-यांची कुचंबना करत, शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळायचे काम करत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष डाॅ.सुनील गावडे यांनी केला आहे.याबाबत डाॅ.सुनील गावडे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, कर्जत, जामखेड तालुक्यातील ऊसाचे गाळपाचे नियोजन करून कर्जत तालुक्यातील अंबालिका , जामखेड तालुक्यातील हाळगाव येथील जय श्रीराम आणि बारामती ॲग्रोच्या मार्फत ऊस रिकव्हरीला कमी असतानाही विक्रमी गाळप केल्याचा दावा आ. रोहित पवार यांनी केला होता.असे सांगताना आ. पवार यांनी पाण्याची अडचण आहे अशा ठिकाणचा पुढच्या वर्षीचा शेतक-यांचा ऊससुध्दा गाळप केल्याचा दावा केला आहे. मात्र आ. पवार यांचा हा दावा साफ खोटा असून , या मतदारसंघात आजही हजारो मेट्रिक टन ऊस गाळपाविना शिल्लक आहे.ही वस्तुस्थिती आहे . मात्र प्रत्येक गोष्टीत श्रेय घेण्याच्या नादात आ. पवार शेतक-यांच्या जिव्हाळयाचा प्रश्र असलेल्या ऊसाच्या प्रश्राची कशाप्रकारे थट्टा करू शकतात हे यावरून दिसून येत आहे.पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दहा दिवसापुर्वी ३० एप्रिल रोजी नगर येथे बैठक घेवून नगर जिल्ह्यात ११ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाविना शिल्लक असल्याचे जाहिर केले होते. या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील एकटया अंबालिका साखर कारखान्याकडे नोंद असलेला २१ हजार मेट्रिक टन ऊस गाळपाविना शिल्लक राहिला असल्याची बाब पुढे आली.तर जामखेड तालुक्यातील जय श्रीराम साखर कारखान्याकडे नोंद असलेला ५०० मेट्रिक टन ऊस गाळपाविना शिल्लक असल्याची अधिकृत माहिती प्रादेशिक उपसंचालक साखर कार्यालयाकडून मिळाली . विशेष म्हणजे हे दोन्ही कारखाने नगर जिल्ह्यातील असल्यामुळे याच दोन कारखान्याकडे ज्या शेतक-यांनी आपल्या ऊसाची नोंद केली आहे. फक्त अशाच नोंदीनूसार शिल्लक ऊसाची अधिकृत माहिती या कार्यालयाकडून मिळाली. मात्र कर्जत तालुक्यातील बहुतांश ऊस हा शेजारी श्रीगोंदा , करमाळा ,इंदापुर ,दौण्ड आणि बारामती तालुक्यातील साखर कारखान्यांना दिला जातो. श्रीगोंदा वगळता उर्वरित सर्व तालुके दुस-या जिल्ह्यात येत असल्याने ही माहिती नगर कार्यालयात उपलब्ध होत नाही. मात्र याठिकाणच्या कारखान्यांनीही कर्जत तालुक्यातील ऊसाची मोठया स्वरूपात नोंद घेतलेली आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यात गाळपाविना ५० हजार मेट्रिक टनापेक्षा अधिक ऊस गाळपाविना शिल्लक असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.जामखेड तालुक्यातील जय श्रीराम साखर कारखान्याने यावर्षीच्या गाळप हंगामात ३ लाख २७ हजार मेट्रिक टन ऊस गाळप केले.मात्र एकुण गाळपापैकी केवळ १ लाख ५९ हजार मेट्रीक टन ऊस जामखेड तालुक्यातील गाळप केला असून , ऊर्वरित १ लाख ६८ हजार मेट्रिक टन ऊस करमाळा ,आष्टी, परांडा या तालुक्यातील गाळप केला आहे.या कारखान्याकडे नोंद असलेला ५०० मेट्रिक टन ऊस आजही शिल्लक असल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्याकडून मिळते. दरम्यान जामखेड तालुक्यातील बहुतांश ऊस हा करमाळा तालुक्यातील कमलादेवी साखर कारखाना, भैरवनाथ साखर कारखाना विहाळ येथे दिला जातो.या दोन्ही कारखान्याचे गटऑफीस जामखेड तालुक्यात असून , या दोन्ही कारखान्याकडून दरवर्षी नियमीत नोंदी घेवून, ऊस नेला जातो. मात्र यावर्षी नोंदीचा ऊसही शिल्लक असल्याने शेतक-यांमध्ये संताप आहे. करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे जामखेड तालुक्यातील बारा गावात कार्यक्षेत्र असून, जवळपास चार हजार सभासद हे या कारखान्याचे सभासद आहेत.मात्र हा कारखाना बंद असल्याने ऊसाचा प्रश्र अधिकच गंभीर बनला असून, ऊस घालवताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे.प्रत्येक गोष्टीत श्रेय घेण्यासाठी आ. पवार केविलवाणी प्रयत्न करत असतात. बहूतांश कामे ते ओढून ताणून स्वता मीच केली असे सांगताना ते शेतक-यांची कशाप्रकारे दिशाभूल करतात हे या प्रकारातून समोर आले आहे. असा आरोप भाजपा तालुकाध्यक्ष डाॅ.सुनील गावडे यांनी केला आहे.

.

Leave A Reply

Your email address will not be published.

Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील ! आजचा सुविचार good morning image आयुष्यात कधीच कोणावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करू नका happy holi message in marathi