ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

अहमदनगर: सेतू केंद्रावरही लूट सुरूच , 30 रुपयांच्या दाखल्या साठी 150 ते 200 रुपये


शासकीय कार्यालयातून रहिवाशी प्रमाणपत्रापासून ते जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी पूर्वी मोठ्या प्रमाणात पैसा खर्चून आटापिटा करावा लागत असे . परंतु , शासनाने सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना अतिशय कमी खर्चात प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची सुविधा निर्माण केली आहे . त्यामुळे पूर्वी हजार रूपये खर्चूनही वेळेत न मिळणारी अशी अनेक प्रमाणपत्र केवळ १०० ते २०० रूपयांत वेळेत उपलब्ध होत आहेत . शासनाकडून सेतु सुविधा केंद्रांना विविध प्रमाणपत्र काढून देण्यासाठी दर ठरवून दिले आहेत . परंतु , एवढ्या कमी पैशात प्रिंट , दुकानभाडे , वीजबिल यासह दुकानचा खर्च निघणेही शक्य नाही . त्यामुळे अधिकचे पैसे घेतले जात असल्याचा सूर सेतू सुविधा केंद्र चालकांकडून काढला जात आहे . चुकीच्या सबबीखाली नागरिकांना आर्थिक भूदंड सहन करावा लागत आहे . सदर दर शासनाने ठरवून दिलेले आहेत . शासकीय कार्यालयातील सेतू केंद्रातून याच दराने प्रमाणपत्र काढले जातात . परंतु खाजगी सरकार मान्य केंद्रात अधिक पैसे घेतले जातात .

कार्यालयाचे खेटे वाचल्याचे समाधान मुलांच्या शिक्षणासाठी रहिवासी प्रमाणपत्र , जातीचा दाखला व इतर कागदपत्र काढण्यासाठी तहसील कार्यालयाची खेटे मारण्याची आता गरज नाही . यापूर्वी मी माझ्या मुलीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी सलग आठ ते दहा दिवस दररोज तहसील कार्यालयात गेलेलो . परंतु आता लहान मुलाचे सर्व प्रमाणपत्र सेतु केंद्रातून उपलब्ध झाले . त्यामुळे वेळ आणि पैसाही वाचल्याचे समाधान आहे .

अशोक कलगुंडे , नागरिक

५०० रुपये वाचल्याचे समाधान मुलीच्या उच्च शिक्षणाच्या प्रवेशाच्यावेळी कास्ट सर्टीफिकेट काढण्यासाठी तहसील कार्यालयात जावे लागले होते . परंतु कागदपत्रांची जुळवाजुळव आणि लवकर प्रमाणपत्र मिळविणे हे सुत्र दलालामार्फत २ हजार रुपये देवून प्रमाणपत्र काढले होते . परंतु आता केवळ २०० रुपयात मुलाचे कागदपत्रे काढले गेले आहेत . –

विष्णू देमुंडे , नागरिक

कर्जत , मिरजगाव , माहीजळगाव व राशीन येथे मोजावे लागतात अधिकचे पैसे ■ शासनाने दर ठरवून दिलेले असतानाही कर्जत, राशीन, मिरजगाव,माहीजळगाव व कुळधरण आदी सह तालुक्यात अधिकचे पैसे घेवून प्रमाणपत्र दिले जात आहेत . त्यात तहसील कार्यालयातून सेतू सुविधा केंद्र बंद असल्याने नागरिकांना खासगी केंद्रातूनच प्रमाणपत्र घ्यावे लागतात . त्यामुळे त्यांच्या मनमानीप्रमाणे मागेल तेवढी रक्कम द्यावी लागते .

शहरातील महा – ई – सेवा केंद्र की पिळवणूक केंद्र ?

महा – ई – सेवा केंद्रांमधून उत्पन्नाचा दाखला , रहिवासी दाखला , ७ / १२ , ८ अ , प्रमाणपत्र , निराधार योजना पोचपावती यावर ३३ रु ६० पैसे आहे . पण कर्जत शहरातील व तालुक्यातील महा – ई सेवा कडून १५० ते २०० रुपये घेतले जातात . शासकीय प्रमाणपत्र देण्यासाठी केंद्र संचालकांकडून मनमानी शुल्क आकारून • नागरिकांची लूट केली जाते .


सेतू केंद्रावर कोणते प्रमाणपत्र किती रुपयांत मिळते ?

Leave A Reply

Your email address will not be published.

Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील ! आजचा सुविचार good morning image आयुष्यात कधीच कोणावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करू नका happy holi message in marathi