ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

dirtexmah.gov.in । हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू ,जाणून घ्या

Handloom and Textile Technology Diploma Course - हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू

Handloom and Textile Technology Diploma Course: केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2022-23 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता ओडिसा येथील आयआयएचटी बरगढ तसेच वेंकटगिरी येथे प्रवेश सुरू आहेत. इच्छुक उमेदवारांना 10 जूनपर्यंत अर्ज सादर करता  येणार आहेत .

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका (Handloom and Textile Technology Diploma) अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता ओडिसा येथील आयआयएचटी बरगढ येथे 13 + 1 तसेच वेंकटगिरी येथे 2 जागांच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्याकरिता प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद यांचेमार्फत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज १० जून २०२२ पर्यंत मागविण्यात येत आहेत. उमेदवारांसाठी http://www.dirtexmah.gov.in या संकेतस्थळावर अधिक माहिती व अर्जाचा नमुना उपलब्ध करण्यात आलेला आहे. तसेच अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपायुक्त, वस्त्रोद्योग यांच्या कार्यालयातही उपलब्ध आहे .

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील ! आजचा सुविचार good morning image आयुष्यात कधीच कोणावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करू नका happy holi message in marathi