दहावी बारावी नंतर काय ? भारतीय लष्कराचा B.Sc नर्सिंग कोर्स , मोठी संधी
Indian Army B.Sc Nursing Course: जर तुम्हाला भारतीय लष्कराच्या मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसमध्ये करिअर करायचे असेल, तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. भारतीय लष्कराच्या B.Sc नर्सिंग कोर्समध्ये सहभागी होऊन तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता.
भारतीय लष्कराने B.Sc नर्सिंगच्या 2022 बॅचसाठी ऑनलाइन अर्ज जारी केले आहेत. इच्छुक महिला उमेदवार भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइट www.joinindianarmy.nic.in वर लॉग इन करून अर्ज करू शकतात. B.Sc नर्सिंग कोर्ससाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ३१ मे पर्यंत सुरू राहणार आहे.

भारतीय सैन्यदलानुसार, 2022 च्या 4 वर्षांच्या B.Sc (नर्सिंग) अभ्यासक्रमासाठी केवळ महिला उमेदवारच अर्ज करू शकतात. नर्सिंग कोर्स आणि प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, पात्र उमेदवारांना भारतीय सैन्याच्या विहित अटी व शर्तींनुसार मिलिटरी नर्सिंग सेवेमध्ये कायमस्वरूपी किंवा शॉर्ट सर्व्हिस कमिशन दिले जाईल. 1 ऑक्टोबर 1997 ते 30 सप्टेंबर दरम्यान जन्मलेल्या अविवाहित मुली या कोर्ससाठी अर्ज करू शकतात. घटस्फोटित आणि विधवा महिलांसाठीही भारतीय लष्कराने अर्जाचा मार्ग खुला ठेवला आहे.
शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 10+2 परीक्षा नियमित विद्यार्थी म्हणून पहिल्याच प्रयत्नात 50% गुणांसह उत्तीर्ण झालेल्या मुली भारतीय लष्कराच्या B.Sc नर्सिंग कोर्ससाठी अर्ज करू शकतात. 10+2 च्या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थिनींनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी विषयांमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. चालू शैक्षणिक सत्रात पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी देखील अटीनुसार तात्पुरते अर्ज करू शकतात.