Indian Army मध्ये विविध पदांची भरती, दहावी उत्तीर्णांना देशसेवेची संधी

मुंबई | भारतीय सैन्यासोबत काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. दक्षिण कमांड हेडक्वार्टरमध्ये ग्रुप सी सिव्हिलियनच्या (Group C civilians at Southern Command Headquarters) भरतीसाठी सैन्याने जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये (Employment News) लष्कराने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, आरोग्य निरीक्षक (Health inspector), न्हावी (barber) आणि चौकीदार (watchman) या पदांच्या एकूण 113 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. आरोग्य निरीक्षक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र घेतलेले असावे.