Jeeto Connect 2022: पुण्यात आयोजित ‘जीतो कनेक्ट २०२२’ परिषदेचा समारोप

Jeeto Connect 2022: मानवता हाच खरा धर्म असून, कोणत्याही धर्माचं काम हे माणसाला माणूस बनवणं हे आहे; असं प्रतिपादन प्रेरणादायी वक्ते गौर गोपाल दास यांनी काल पुण्यात केलं.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘जीतो कनेक्ट २०२२’ मध्ये ते बोलत होते. जीवनात मोठी स्वप्न पाहा, अथक प्रयत्न केले तरच प्रगती होऊ शकते, असं गौर गोपाल दास म्हणाले. तीन दिवस चाललेल्या या परिषदेचा कालचा अखेरचा दिवसंही विविध चर्चासत्र, व्याख्यानं, मुलाखती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला.
अभिनेत्री कल्की कोचलिन, निकुंज लोटिया, तन्मय भट, ऋषभ जैन काल झालेल्या एका सत्रात सहभागी झाले होते. या सर्वांनी विविध कारकीर्दींविषयी माहिती दिली. नवउद्योगांना भरारी देण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा अनेकविध कार्यक्रमांचं आयोजन या परिषदेत करण्यात आलं होतं