केळणा नदी गाळ मुक्त व खोलीकरण भव्य शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न.
भारतीय जैन संघटना,जिल्हा प्रशासन व श्री गणपती ना.सह.पतसंस्था भोकरदन(bhokardan) यांच्या संयुक्त विद्यमाने सुजलाम सुफलाम अभियाना अतंर्गत केळणा नदी (Kelna River ) गाळ मुक्त व खोलीकरण कामाचा भव्य शुभारंभ भोकरदन शहरातील पोस्ट ऑफिस जवळील जुन्या पाणी पुरवठा विहीरटाकी समोर करण्यात आला.
सर्व प्रथम आद्य पत्रकार, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले व त्या नंतर आलेल्या प्रमुख पाहुणे व मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला.