लाल महाल लावणी प्रकरन, कोण आहे वैष्णवी पाटील ?

पुण्यातील लाल महालात नृत्य करणाऱ्या वैष्णवी पाटीलसह तिघांवर फरासखाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार दिवसांपूर्वी वैष्णवी पाटील आणि तिच्या साथीदारांनी लाल महालातील मोकळ्या जागेत नृत्य करत शूटिंग करून व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल केले होते.
लावणीचे लाल महाल येथे शूटिंग केल्याप्रकरणी महिला कलाकार आणि अन्य तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली. प्रकरण तापल्यानंतर डान्सर वैष्णवी पाटीलला माफी मागावी लागली.
कोण आहे , वैष्णवी पाटील ?
वैष्णवी पाटील हिचं टोपणनाव डॉली आहे. तिचा जन्म २० मे १९९९ रोजी पुण्यातच झाला.
वैष्णवी पाटील आणि तिची बहीण गिरिजा हिच्यासोबत पुण्यातच नृत्य अकादमी चालवतात. बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने वैष्णवीचं नाव छोटी माधुरी असं ठेवलं आहे.