Mohini Ekadashi 2022 Date: कधी आहे ‘मोहिनी एकादशी ‘ जाणून घ्या पूजा विधी आणि शुभ मुहूर्त
Mohini ekadashi 2022 date : वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, या दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनीचा अवतार घेतला आणि देवतांना अमृत पाजले. देवासुर युद्धाचा अंतही याच दिवशी झाला, अशीही मान्यता आहे. यावेळी मोहिनी एकादशी गुरुवार, १२ मे रोजी साजरी होणार आहे. ज्योतिषांच्या मते यावेळी मोहिन एकादशी विशेष योगायोगाने साजरी होणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार मोहिनी एकादशीच्या दिवशी चंद्र कन्या राशीत प्रवेश करेल. तर शनि कुंभ आणि गुरू मीन राशीत बसेल. दोन मोठे ग्रह सुद्धा स्वराशीत असतील. ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे राजयोगासारखा योग तयार होत आहे. दुसरी, मोहिनी एकादशी १२ तारखेला साजरी केली जाईल जो भगवान विष्णूंचा आवडता दिवस आहे.
मोहिनी एकादशी शुभ मुहूर्त
बुधवार, 11 मे 2022 रोजी सायंकाळी 7.31 पासून सुरू होऊन गुरुवार, 12 मे 2022 रोजी सायंकाळी 6.51 पर्यंत राहील. या दरम्यान, तुम्ही कोणत्याही शुभ वेळी भगवान विष्णू किंवा त्यांच्या अवतारांची पूजा करू शकता.