मातृत्व दिन विशेष कविता – कल्पना मेहर
जिथे असतो जिव्हाळा तिथे दडपण येत नाही. आईविना घराला घरपण येत नाही.
जिथे असतो आईच्या आशीर्वाद तिथे कसलीही उणीव भासत नाही. आईची उणीव कोणीही भरून काढत नाही. आई म्हणजे संस्काराचे मोती, ज्ञानाचा दीप. आई असताना कुठलेही दुःख वाटत नासते, कुणाचीही साथ मिळाली नसली तरी, आईच्या आशीर्वाद नेहमी सोबत असते.
जग फिरता फिरता जेव्हा एखादी ठोकर लागते, दुःखातली पहिली आरोळी
ही आईच असते.
आई असते एक नाजूकसा सोनेरी धागा, आपल्या जीवनात प्रकाश पाडणारी
समईतली जागा.
आम्हणजे ‘आत्मा’ व ई म्हणजे ‘इश’. आत्मा व इश मिळून बनलेली ईश्वरी,
जगत जननी आई.
आई मला तुझ्या कुशीत अजूनही शिरायचं आहे, मांडीवर डोकं ठेवून मुसमुसून रडायचं आहे. अजूनही तुझा स्पर्श मला अनुभवायचा आहे. तुझ्या त्या नाजूक स्पर्शातून सळसळत वाहत
जायच आहे.
ठेवशील ना ग माझ्या डोक्यावर सतत हात ? देशील ना गं मला भरभरून आशीर्वाद ?
आई तुला मातृत्व दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
कल्पना मेहर गणेशपूर, भंडारा.
View this post on Instagram