ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

कर्जत तालुक्यातील समाज मंदिरांमध्ये अभ्यासिका केंद्र चालु करावे – भास्कर भैलुमे 

कर्जत तालुक्यातील प्रत्येक गावातील समाज मंदिराचे ,रूपांतर अभ्यासिका केंद्र , वाचणालय किंवा बुध्द विहारात करण्याचे आवहान पाणीपुरवठा सभापती भास्कर भैलुमे यानी प्रसिद्धी पञकाच्या माध्यमातुन केले आहे . आजची परिस्थिती बघितली तर विभक्त कुटुंब पद्धती किवा एकत्र कुटुंब पध्दतीमुळे मुलांना अभ्यास करण्यासाठी सोई सुविधा उपलब्ध होत नाही त्यामुळे मुलांच्या अभ्यासावर परिणाम दिसून येत आहे त्यामुळे संपुर्ण तालुक्याचा सर्व्ह केल्यानंतर याच गोष्टी निदर्शनास आल्या आहेत व त्या नंतर एक विचार ङोक्यात आला आहे की प्रत्येक गावात समाज मंदिर बांधले गेले आहे की ज्या ठिकाणी विचित्र परिस्थिती पहावयास मिळते आहे तेव्हा त्या समाज मंदिराचे रूपांतर आपण सर्व आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी आता अभ्यासिका केंद्र ,वाचणालय अथवा बुध्द विहारात करणे गरजेचं आहे जेणे करून समाजातील ज्या मुलांना घरी अभ्यास करण्यासाठी सुविधा नाहीत त्या मुलांना या अभ्यासिका केंद्रामध्ये अभ्यास करता येईल , तसेच त्याठिकाणी वेगवेगळय़ा श्रेञातील अधिकारी बोलऊन चर्चासत्र घङविता येतील जेणे करून मुलांना त्यांचे भविष्य घङविता येईल व विश्वरत्न ङाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होते की समाजातील युवकांनी प्रशासनातील मानाच्या व मोक्याच्या जागा पटकाविल्या पाहिजेत.

हे महामानवाचे स्वप्न साकार करण्या साठी कर्जत तालुक्यातील आंबेडकरी चळवळतील कार्यकर्त्यांना आवहान करण्यात येते की तथागत गौतम बुद्ध जयंतीच्या निमित्ताने आपण प्रत्येक गावातील समाज मंदिराचे रूपांतर आता अभ्यासिका केंद्र करूण तथागताला अभिवादन करण्याचा आपण सर्वानी संकल्प करूण बहुजन समाजातील प्रत्येक विद्यार्थी साठी त्यांना एक हक्काची अभ्यासीका उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रकारची मदत करण्याचे अहवाहन कर्जत नगरपंचायतीचे पाणीपुरवठा विभागाचे सभापती भास्कर भैलुमे यांनी केले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.

Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील ! आजचा सुविचार good morning image आयुष्यात कधीच कोणावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करू नका happy holi message in marathi