ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Education News : स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सूक्ष्म वाचन आवश्यक – श्री. अमोल जाधव


Education News : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना चौथी – पाचवी पासून ते उच्च शिक्षणातील अभ्यासक्रमापर्यंत सर्व पुस्तकांचे आणि वृत्तपत्रांचे वाचन आवश्यक आहे. वाचन हे आपल्या विचारांना खाद्य पुरविते. त्यामुळे विचारातील प्रगल्भता वाढून आकलन क्षमता वाढते. व्यक्तिमत्त्व समृद्ध होते. या हेतूने स्पर्धा परीक्षेतील यशासाठी सूक्ष्म वाचन आवश्यक आहे. असे प्रतिपादन कर्जत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री. अमोल जाधव यांनी केले.


येथील दादा पाटील महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्यावतीने ‘अधिकारी आपल्या भेटीला ‘ या उपक्रमांतर्गत ‘असेल ध्येयाची आस ! तर यश मिळेल हमखास ‘ या विषयावरील मुक्तसंवाद कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर होते. यावेळी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व पोलीस उपनिरीक्षक पदी नुकतीच निवड झालेले दत्ता बाराते, आरटीओ पदी निवड झालेले श्री. अमोल सुद्रिक, उपप्राचार्य भास्कर मोरे व डॉ. महेंद्र पाटील, संजय पाटील उपस्थित होते.


अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. नगरकर म्हणाले की,स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना आपण ग्रामीण भागातील आहोत, मराठी प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलेले आहोत,सर्वसामान्य परिस्थितीत वाढलेले आहोत हा न्यूनगंड विद्यार्थ्यांनी मनातून काढून टाकावा.तरुणांमध्ये यश संपादन करण्यासाठीची ऊर्जा असते, जिद्द असते. फक्त अभ्यासात सातत्य असेल तर यश निश्चित मिळते.


यावेळी नवनियुक्त पीएसआय श्री. बाराते, आरटीओ श्री. सुद्रिक यांनी स्पर्धा परीक्षेसाठीचा अभ्यास कसा करावा ? संयम ठेवून जिद्दीने कसा अभ्यास करावा ? यासंदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कैलास रोडगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रामकृष्ण काळे यांनी केले. तर आभार प्रा. नितीन काळे यांनी मानले. कार्यक्रमास प्रा. वनदास पुंड, प्रा. दिग्विजय कुंभार, प्रा. बबन कुंभार, डॉ.ए.एच. भोंडवे यांच्यासह अनेक प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सर्व अधिकाऱ्यांनी समर्पक उत्तरे दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील ! आजचा सुविचार good morning image आयुष्यात कधीच कोणावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करू नका happy holi message in marathi