उन्हाळी सुट्ट्या ।उन्हाळी सुट्टी निबंध मराठी।Summer Holiday Essay Marathi
Summer Holiday Essay Marathi: मित्रांनो बघता बघता उन्हाळी सुट्ट्या संपत आल्या. आणि आता ५/६ दिवसांत ही धरनी माता चिंब पावसात न्हाऊन निघेल. पण तोपर्यंत मी माझ्या सुट्ट्या कश्या घालवल्या, मी ह्या सुट्टीत काय काय केलं आहे पाहूया.२०२२ हे माझं १२ वी च वर्ष होत. माझं संपूर्ण वर्ष हे ऑनलाईन शिक्षण घेण्यात गेल. एक दिवस पण माझं कॉलेज सुरु नाही झालं म्हणून आम्ही सर्व जण खूप उदास होतो. कॉलेज मध्ये जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा अपूर्ण राहिली. आणि त्यामुळे खूप अडचणी निर्माण झाल्या. अकॉउंट सारखा विषय काही कळंत नव्हता. कोरोना मुळे सर्वांनाच आर्थिक परिस्थितीला तोंड द्याव लागलं.म्हणून क्लास नाही लावला. आणि परिणामी पेपर अवघड गेले. १० वी चे पेपर किती छान गेले होते. एक एक करून पेपर संपले आणि सुट्टी सुरु झाली.
मग काय आता ‘मज्जाच मजा’ फक्त फिरायच खायचं प्यायच ,अभ्यास नाही, कोणाच टेंशन नाही. सुट्टी लागली कि लगेच मी मामा च्या गावी गेले. गावाकडे भरपूर कैऱ्या, चिंचा,आंबे, जांभूळ, कलिंगड, सगळी फळबागांची पंगत च घरी भरली होती. दिवसभर रानावनात फिरायच झाडावर चढायच. मामा सोबत एखाद झाड लावायचं आणि संध्यकाळी आजी आणि मामी ला मदत करायची. आजी आम्हाला गोष्टी सांगायची गोष्ट ऐकायला वय लागत नाही हेच खरयं. आजी तिच्या लहानपणी च्या गोष्टी सांगायची. गावाला गेल्यामुळे फोन ची सवय तुटली हे बरं झालं. कारण ह्या दोन वर्षात फोन ची खूप सवय झाली होती. पण गावाकडे फोन घ्यायची इच्छाच नाही झाली. आजी सोबत कोल्हापूर ला बाळुमामा, महालक्ष्मी ला जाऊन आले.
उन्हाळ्यात च माझ्या दादा च लग्न होत. म्हणून खूप जास्त मजा आली. मेहंदी, संगीत, घाणा, भडण, हळद, आणि मग लग्न 4/5 दिवस अगदी आनंदात गेले. त्यानंतर आमच्या घरी माझी मावशी तिचे मुलं आली. मावशी म्हणजे जणू आईचं दुसरं रूपच ती आली कि आई ओरडत नाही काही काम सांगत नाही.मावशी ला घेऊन आम्ही आपल्या पुण्यातले प्रसिद्ध असे खडकवासला धरणावर गेलो.काकी आणि आत्या आल्यावर कात्रज च्या सर्प उद्यानात गेलो.सारस बागेत,शनिवार वाडा, यार खूपच मज्जा आली. पण सगळे गेल्यावर मला करमेना. माझा MSCIT चा क्लास १० वी नंतर च झालता. मग आता काय करावं बरं. म्हणून मी जर्मन भाषा शिकायचे ठरवले. आणि आई कडून स्वयंपाक शिकुन घेतला. मला क्वेक बनवता येतात मी सुट्ट्यांमध्ये केक च्या ऑर्डर घेत होते. शिवाय मी आइस्क्रीम,मस्तानी,असे खूप सारे पदार्थ शिकले.
मला वाचायला आवडतं म्हणून मी गूगल वर, किंवा पेपर, youtube वर इन्फॉर्मेटीव विडिओ ऐकले. वि.स. खांडेकर यांचं ‘ययाति’ हे पुस्तक वाचलं.अंगावर काटा आला पुस्तक वाचून. खूप छान आहे ते पुस्तक. मी थोड्याफार कविता पण केल्याआणि मे महिन्याच्या शेवटी मी माझ्या ताई सोबत पुढे काय करायचं शिक्षणाचं कस करायचं हे सगळं विचार करून निर्णय घेतला. मी आता फक्त निकाल लागायची वाट बघत आहे. एकदा का निकाल लागला कि मग पुढच्या करिअर ला सुरुवात करता येईल.अशी हि माझी उन्हाळ्याची सुट्टी फिरत, मजा करत खूप काही शिकत अगदी आनंदाने गेली , पण याच उन्हाळ्याच्या सुट्टीत मी माझा एक खास मित्र गमावला ….