दहावीचा निकाल उद्या (शुक्रवार) जाहीर होणार

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. १७ जून, २०२२ रोजी दु. १ वा. ऑनलाईन जाहीर होईल, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत दिली आहे.
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या 17 जून रोजी जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना MH10.ABPMajha.Com या लिंकवर निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी अँड एज्युकेशन मार्फत उद्या दहावीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत.