ब्रेकिंग न्यूज – राज्यात पुन्हा मास्क सक्ती ,जाणून घ्या काय काय बदलणार !

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा मास्क (Mask) सक्ती करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी (In public places) मास्क वापरणं बंधनकारक असेल. वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय. रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृह या ठिकाणी मास्क सक्ती करण्यात आली आहे. रुग्णालये, कॉलेज, शाळा या ठिकाणीही मास्क सक्ती असेल.
कुठे-कुठे मास्क घालणे बंधनकारक असणार आहे ?
1 सार्वजनिक वाहतुकीची ठिकाणं, 2 शाळा, 3. कॉलेज, 4. बंदीस्त सभागृह, 5. गर्दीची ठिकाणं, 6. रेल्वे, 7. बस, 8. सिनेमागृहे, 9. रुग्णालये, 10. हॉटेल.