ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Ahmedangar : तहसीलदाराच्या भरारी पथकावर वाळूचा डंपर घालत जीवे मारण्याचा प्रयत्न, या तालुक्यातील घटना!


कर्जत: कापरेवाडी शिवारात शुक्रवारी संध्याकाळी कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे आणि त्यांच्या भरारी पथकावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाने वाहन पळवून नेण्याच्या उद्देशाने अंगावर वाहन घालीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रसंग सावधान राखीत वाहन बाजूला केल्याने पथकातील कर्मचारी बचावले. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरचा २२ किमी पाठलाग करून पथकाने त्यास ताब्यात घेतले.


शुक्रवार, दि १० रोजी तहसीलदार नानासाहेब आगळे यांना कापरेवाडी शिवारात अवैध आणि विनापरवाना वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. तहसीलदार आगळे यांनी तात्काळ पथक तयार करीत कापरेवाडी गाठले. यावेळी पथकास (एमएच१७ बीवाय ७६७३) क्रमांकाचा डंपर येताना दिसला. यावेळी पथकाने तपासणी केली असता त्यात वाळू आढळून आली. वाहनचालकाकडे परवाना असल्याची माहिती घेत असताना त्याने विना परवाना वाळू वाहतूक करीत असल्याचे सांगितले. डंपर कोणाच्या मालकीचा असल्याची विचारणा केली असता चालकाने विनोद उर्फ आबा कदम(माहीजळगाव) यांच्या मालकीचा असल्याचे पथकास सांगितले. त्यानंतर तहसीलदार आगळे यांनी सदरचा डंपर तहसील कार्यलयास घेण्यास सांगितले. डंपर कर्जतच्या दिशेने घेत असताना चालकाच्या भ्रमणध्वनीवर वाहनमालक कदम याचा फोन आला असता त्याने चालकास डंपर कर्जतला घेवून जाण्यास मज्जाव केला. चालकाने तात्काळ डंपर भरारी पथक असलेल्या वाहनाच्या (एमएच १६ बीझेड ७१७२) विरुद्ध दिशेने घेत तहसीलदार असलेल्या वाहनाच्या अंगावर घालत कापरेवाडीहुन शिंदेवाडीमार्गे टाकळी खंडेश्वरीकडे वळवला. यावेळी शिंदेवाडी लगत असलेल्या सोलर प्लांटच्या जवळ रस्त्यावरच वाळूने भरलेला डंपर खाली करीत भरधाव टाकळीकडे गेला. यावेळी रस्त्याची लांबी मोठी असल्याने तहसीलदार आगळे यांनी आपली चारचाकी गाडीने तब्बल २२ किमी डंपरचा पाठलाग करीत वाहनचालक आणि क्लिनर यास ताब्यात घेतले. तलाठी गणेश सोनवणे यांच्या फिर्यादीवरून संबंधित वाहनमालक विनोद उर्फ आबा दादा कदम (रा. माहीजळगाव), वाहनचालक लक्ष्मण भुजंग काळे (रा. वालवड) , क्लिनर शुभम भाऊसाहेब मंडलिक (रा सितपुर) यांच्यावर कर्जत पोलीस ठाण्यात भादवी कलम १८६० नुसार ३०७, ३५३, ३७९, ४२७, ५०४, ३३ यासह खाण व खनिजे (विकास व विनियमन) अधिनियम १९५७ चे कलम २२ व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम४८(७)(८) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार नानासाहेब आगळे, अव्वल कारकून संजय दुधभाते, अशोक नरोड यांच्यासह तलाठी धुलाजी केसकर, अविनाश रोडगे, गणेश सोनवणे, दीपक बिरुटे, पोलीस कर्मचारी देविदास पळसे, नितीन नरुटे यांनी पार पाडली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !
Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !