ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Ahmednagar: पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती सोहळा नव्हे , तर चोंडीत पार पडला ” कौतुक सोहळा. “

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जयंतीचे निमित्त करून , जेष्ठ नेते शरद पवार यांनी आपले नातू आ रोहित पवार यांचा कौतुक सोहळा उरकुन घेतला आहे.असा खळबळजनक आरोप भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते शांतीलाल कोपनर यांनी केला आहे.

Ahmednagar : ३१ मे रोजी चोंडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilya Devi Holkar) यांच्या आ. रोहित पवारांच्या ( Rohit Pawar) वतीने झालेल्या जयंती कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शांतीलाल कोपनर यांनी याबाबत प्रसिध्दीपत्रक काढले आहे.त्यात म्हटले आहे ,

जयंतीच्या निमित्ताने राज्यभरातून धनगर समाज बांधव मोठया भक्ती भावाने चोंडीला येत असतात. यानिमित्त धनगर आरक्षण, मागील सरकारने जाहिर केलेले आरक्षण मिळेपर्यंत आदिवासी समाजाला असणा-या सर्व योजना धनगर समाजाला लागु करण्याचा निर्णय व या योजनांसाठी एक हजार कोटी रूपयांचा निधी देण्याचा निर्णय झाला होता. याप्रश्री एक हजार कोटी रूपयांचा निधी देण्याची मागणी गेल्या अडीच वर्षात वारंवार होत असताना आघाडी सरकारकडून याप्रश्री दुर्लक्ष होत आहे. या प्रश्रांबाबत काही ठोस आश्वासन मिळेल ही अपेक्षा होती. मात्र धनगर समाजाची घोर निराशा झाली. जेष्ठ नेते शरद पवार यांनी संपुर्ण भाषणात धनगर समाजाच्या प्रश्राबाबत भ्रशब्द न काढता फक्त आ रोहित पवार यांचे कौतुक करण्याचेच काम केले. यातून प्रशासनाला हाताशी धरून धनगर समाजातील माजीमंत्री प्रा राम शिंदे व आ गोपीचंद पडळकर यांना चोंडीत जयंती कार्यक्रम करण्यापासून रोखायचे आणि स्वताच्या नातवाचा कौतुक सोहळा करायचा असा प्रश्र धनगर समाजात विचारला जात आहे.

बंधा-यात गेल्या अडीच वर्षात कुकडीचे पाणी एकदाही सोडले नाही .

विशेष म्हणजे जेष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या नातवाचे कौतूक करताना आपल्या नातवाचा सुतराम सबंध नसलेल्या दोन महामार्ग मंजूर केल्याचे धांदात खोटे बोलण्याचा कळस गाठला. अहिल्यादेंवीनी जसे दळणवळणाची सोय केली.तसेच काम रोहित पवार करत असून दोन महामार्गांना मंजूरी आणल्याचे खोटे बोलण्याचे काम त्यांच्याकडून झाले. शरद पवारांकडून रोहित पवार हे अहिल्यादेवींसारखे कार्य करत असल्याच्या उल्लेख खटकणारा ठरला. आ रोहित पवारांच्या गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात अहिल्यादेवींच्या चोंडी येथील बंधा-यात गेल्या अडीच वर्षात कुकडीचे पाणी ऐकदाही सोडण्यात आलेले नाही. कर्जत तालुक्यात गेल्या अडीच वर्षात कुकडीचे उन्हाळी आवर्तन पाणी कधीही सोडलेले नाही. कर्जत तालुक्यातील मंजूर असलेल्या महत्वाकांक्षी तुकाई चारी योजनेचे काम बंद करण्याचे काम आ रोहित पवार यांनी केले. पाणी इथे कसे आणता येईल यासाठी आ रोहित पवारांनी अनेक बैठका घेतल्या असल्याचे जेष्ठ नेते शरद पवार म्हणाले , मात्र या बैठका कधी घेतल्या आणि या बैठकातून काय निष्पन्न झाले ? याउलट गेल्या अडीच वर्षात आहे ते हक्काचे कुकडीचे उन्हाळी आवर्तन बंद करण्याचे काम झाले.परिणामी पाण्याअभावी शेतक-यांची उभी पिके जळाली. मात्र याप्रश्री सोईस्कर दुर्लक्ष करणारे आ रोहित पवार कोणत्या अर्थाने अहिल्यादेवींसारखे कार्य करतात ? असा प्रश्र उपस्थित होत आहे.
इंदिरा गांधीच्या काळापासून रखडलेला पाण्याचा प्रश्र आ रोहित पवारांनी सोडवला असे वक्तव्य जेष्ठ नेते शरद पवारांनी केले.मात्र हा कोणता प्रश्र होता जो इंदिरा गांधीच्या काळापासून रखडलेला होता ? याचा शोध कार्जत जामखेडची जनता कालपासून घेत आहे.

मराठा ,धनगर ,ओबीसी आरक्षण राज्याच्या हातात नाही .तर केंद्राच्या हातात आहे.असे सांगून या महत्वाच्या प्रश्रातून अंग काढून घेण्याचे काम आ रोहित पवार यांनी केले. तर शरद पवार यांनी तर यावर एक चकार शब्दही काढला नाही.

कोण करते जयंती कार्यक्रम ?

चोंडीत जयंती कार्यक्रमाला ३१ मे १९९६ पासून प्रारंभ झाला. सन १९९६ ते २०१५ या वीस वर्षात महादेव जानकर यांच्या राष्टीय समाज पक्षाने जयंती कार्यक्रम चोंडीत केला.मात्र २०१६ पासून राष्टीय समाज पक्षाने जयंती कार्यक्रम मुंबईला आझाद मैदानावर साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चोंडीत जयंती उत्सव साजरा करण्यासाठी तत्कालिन मंत्री व अहिल्यादेवींचे वंशज प्रा राम शिंदे यांनी पुढाकार घेतला. मात्र प्रा राम शिंदे यांनी जयंती कार्यक्रम भाजपातर्फे साजरा न करता धनगर समाजातील सर्वपक्षीय नेतेमंडळींना बरोबर घेत जयंती कार्यक्रम साजरा केला. शेकापचे दिवंगत गणपतराव देशमुख, राष्टवादीचे अण्णा डांगे यांच्यासह अन्य विविध पक्षातील नेतेमंडळींना विश्वासात घेत , महिनाभर अगोदर पुण्यात जयंती नियोजन बैठक घेत सर्वांना विश्वासात घेवूनच सर्वपक्षीय जयंती प्रा शिंदे यांनी साजरी केली. २०१६ ते २०१९ पर्यंत प्रा शिंदे यांनी जयंती साजरी केली. कोरोना प्रतिबंधामुळे २०२० आणि २०२१ मध्ये त्यांना जयंती साजरी करता आली नाही. यावर्षी कोरोना प्रतिबंध शिथील करण्यात आल्याने जयंती साजरी करण्याची तयारी प्रा राम शिंदे यांनी केली होती.मात्र आ रोहित पवार यांनी अनपेक्षितपणे जयंती कार्यक्रम स्वता करत , इतरांना मात्र प्रशासनाच्या माध्यमातून जयंती कार्यक्रम करण्यास आडकाठी घातली.

यापुर्वी जयंती कार्यक्रम सर्वपक्षीय झाले.मात्र यावर्षी जयंती कार्यक्रमावर राष्टवादीचा पगडा राहिला.मंडपाचे कापड राष्टवादी पक्षाच्या झेंड्याच्या रंगाशी मिळते जूळते वापरण्यात आले. या जयंती कार्यक्रमावर राष्टवादीचा एव्हढा पगडा होता की, कार्यक्रम व्यासपीठापासून केवळ १०० फुटावर घर असलेले माजीमंत्री प्रा राम शिंदे यांना जयंती कार्यक्रमाला बोलवावे असे कोणालाही वाटले नाही.प्रा राम शिंदे यांनी जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे पहाटे साडेपाच वाजता अहिलेश्वर मंदिरात अभिषेक करून, घरी जनतेशी संवाद साधला.

आ .रोहित पवारांनी प्रशासनाचा अतिरेकी वापर केल्याचे चोंडीत दिसून आले. स्वता आयोजित केलेला जयंती कार्यक्रम होईपर्यंत इतरांनी चोंडीत सूध्दा यायचे नाही. हा मोघलाईची आठवण करून देणा-या प्रवृत्तीचे दर्शन आ रोहित पवारांनी करून दिले. परिणामी दुपारी तीन वाजता आ गोपीचंद पडळकर ,माजीमंत्री प्रा राम शिंदे व सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत चोंडीत झालेल्या सभेस प्रशोभक जमाव हजारोंच्या संख्येने जमला. यावेळी शरद पवार आणि रोहित पवारांच्या विरोधात घोषणा देत पडळकर,शिंदे व खोत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्याचे भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते शांतीलाल कोपनर यांनी सांगितले.

व्हॉटसॲप ग्रूप जॉईन करा

Leave A Reply

Your email address will not be published.

Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !
Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !