ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

अकोला : जेसीबीत झोपला होतो ड्रायव्हर ,पुरात JCB सोबत युवक पण बुडाला !

कुराणखेड : गुरुवारी रात्री राष्ट्रीय महार्गावरील पुलाच्या कामावर असलेला मजूर युवक पुरात वाहून गेल्याची घटना घडली आहे . हा युवक कुरणखेड परिसरातील एका मोठ्या नाल्याच्या परिसरात रात्री जेसीबीमध्ये झोपलेला असलायची माहिती आहे . नाल्यातून आलेल्या पाण्याच्या प्रचंड लोंढ्यामध्ये रात्री दीडच्या सुमारास अचानक जेसीबी कोसळली. यामध्ये हा युवक वाहून गेला की दबला, याबाबत शोध घेणे सुरू आहे.

याबाबत सकाळ ने वृत्त प्रकाशित केलं आहे .तालुक्यातील कुरणखेड काटेपूर्णा नदीच्या जवळ मोठा नाला आहे. येथे गुरुवारी दिवसभर दोन जेसीबीद्वारे काम सुरू होते. रात्री काम झाल्यानंतर कार्यरत तीन मजूर याच जेसीबींमध्ये झोपी गेले. एका जेसीबीमध्ये दोन मजूर होते. रात्री पावसाचा जोर वाढला. नाल्याचा पाण्याचा ओढा जेसीबीपर्यंत पोहोचला. जेसीबी हळूहळू पाण्यात जात असल्याची दिसल्याने एका मजुराने आपल्या जेसीबीत असलेल्या व्यक्तीला उठवून बाहेर काढले. त्यांनी दुसऱ्या जेसीबीत झोपलेल्या मजुरांना उठविण्याचा प्रयत्न केला. यातील एकाला कसेतरी बाहेर काढले. पण, दुसऱ्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच जेसीबी उलटली. यामुळे युवक पाण्यात वाहून गेला किंवा दबला असल्याचा संशय आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !
Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !