Ashadh Month Information: आषाढ महिना माहिती मराठी ,जाणून घ्या आषाढ महिन्याचे महत्व !

Ashadh Month Information: आषाढ (Ashadh ) हा हिंदू पंचांगा प्रमाणे वर्षातला चौथा महिना आहे . या महिन्याच्या पौर्णिमेस चंद्र पूर्वाषाढा नक्षत्राच्या आसपास असतो म्हणून या महिन्याला आषाढ महिना असे म्हणतात . आषाढ महिन्याला आखाड असेही म्हणतात .(आषाढ महिना)
आषाढ महिन्यातील सण
देवशयनी आषाढी एकादशी – आषाढी एकादशीचे दिवशी पूर्ण दिवस उपवास असतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच आषाढ शुद्ध द्वादशीला तो सोडला जातो. वारकऱ्यांच्या आयुष्यात आषाढीला पंढरपूरला जाणे ही एक मोठी समाधानाची बाब असते. यादिवशी महाराष्ट्रतील सर्व वारकरी लाखोंच्या संख्येनं पंढरपुरात दाखल होतात .(आषाढ महिना)
वासुदेव द्वादशी व्रत. आषाढ शुद्ध द्वादशी.
पिता वसुदेव यांच्या नावावरून वासुदेव हे नाव मिळालेल्या भगवान श्रीकृष्ण यांची विधिवत पूजा करून जे व्रत केले जाते त्याला वासुदेव द्वादशी व्रत असे म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीमाता यांचीही पूजा करण्यास सांगितले आहे. या दिवशी पूजा करून झाल्यावर विष्णूसहस्त्रनामाचा पाठही केला जातो. (आषाढ महिना)
गुरू पौर्णिमा : आषाढ पौर्णिमा
दरवर्षी आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला पूर्ण भारतात सर्वजण आपापल्या गुरूंचे पूजन करीत असतात. आषाढ पौर्णिमा म्हणजे महाभारतकार आणि वेदांचे निर्माते महर्षी व्यास यांच्या जयंतीचा दिवस असतो म्हणूनच या तिथीला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असे म्हटले जाते. महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार होते. भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना व्यासांनीच केली आहे. व्यासांनी वेदांचे नीटपणे विभाजन आणि संपादन केले.पूर्वी वेद एकच होता.त्याचे चार भाग व्यासांनी केले. व्यासांनी महाभारत लिहिले.(आषाढ महिना)