ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

राज्य सरकारने ७ वा वेतन आयोगाचा फरक तातडीने देणेबाबतचे परिपत्रक नुकतेच निर्गमित

Pune: शासन निर्णयाशी समकक्ष राहुन महिपालिका आयुक्त व पीएमपीएमएल आयुक्त हे देखील‌ कर्मचाऱ्यांच्या बाजुने निर्णय घेतील अशी अपेक्षा कामगारांना लागली आहे

पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांचा जिव्हाळ्याचा सातवा वेतन आयोगासाठी उपमुख्यमंत्री अजितदादांकडे पाठपुरावा करणे कामी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते पार्थ दादा पवार यांचे स्वीय सहाय्यक, पिं चि.शहराध्यक्ष,नगरसेवक अजितभाऊ गव्हाणे, महिला शहराध्यक्ष कविताताई आल्हाट, नगरसेवक मयुर भाऊ कलाटे, नगरसेवक विक्रांत लांडे, नगरसेवक श्याम लांडे, नगरसेवक राहुल भोसले, माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, युवक अध्यक्ष इमरान शेख, किरण देशमुख यांना निवेदन दिले .

तसेच महागाई मुळे सामान्य कामगारांचे जीवन होरपळुन निघालेले असल्याने सातवा वेतन आयोगाविषयी कामगारांमध्ये असंतोष पसरलेला असुन त्याचा परिणाम त्यांच्या दैनंदिन कामकाजावर जाणवु असल्याने शहरि सर्व नगरसेवक, पदाधिकारी यांनी तातडीने लक्ष घालुन वेतनाचा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी पीएमपीएमएल राष्ट्रवादी कामगार युनियनच्या वतीने करण्यात आली यावेळी संतोषभाऊ शिंदे, दिपक भाऊ गायकवाड,योगेश चौधरी,संदिप कोंढाळकर,जितु पोरे,विराज कसबे,सोमनाथ भोसले, सोमवंशी, व इ.पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.

Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !
Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !