कर्जत : दादा पाटील महाविद्यालयातील विद्यार्थी प्रशांत ढवळे यांची जपानच्या कंपनीत निवड

Ahmednagar : रयत शिक्षण संस्थेच्या येथील दादा पाटील महाविद्यालयातील बारावी किमान कौशल्य विभागातील विद्यार्थी प्रशांत मथुरदास ढवळे यांची जपान मधील कंपनीत निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी दिली.
हा विद्यार्थी किमान कौशल्य विभागातून अकौंटिंग ॲण्ड ऑफिस मॅनेजमेंट हा व्यवसाय अभ्यासक्रम घेऊन 2021 मध्ये एच. एस. सी. बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झाला . जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय अहमदनगर यांच्यावतीने घेण्यात आलेल्या भरती मेळाव्यात जपान येथील डी रिंकू होल्डिंग्ज ॲण्ड ओरिएंट सासी प्रा. लिमिटेड या कंपनीत त्याची निवड झाली आहे.
या निवडीबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके, संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार, संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादास पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य राजेंद्र निंबाळकर, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पासाहेब धांडे, प्राचार्य डॉ.संजय नगरकर, प्रा. प्रकाश धांडे ,प्रा.मधुकर भुजबळ, प्रा. भागवत यादव, डॉ.दत्तात्रय शेंडे, डॉ.संतोष लगड आणि डॉ. प्रतिमा पवार यांच्यासह सर्व स्टाफने या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. शिवाय या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.