ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

सरकार बदलण्याचा अगर उलथून टाकण्याचा अधिकार लोकांना आहे ? वाचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा 

स्वातंत्र्याचा जाहीरनामा  ४ जुलै १७७६ रोजी वसाहतींनी आपल्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा घोषित केला. तो तयार करण्यात थॉमस जेफरसन याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. सर्व मानव समान आहेत; जीवित, स्वातंत्र्य व सुखाचा शोध घेणे हे मानवाचे मूलभूत हक्क आहेत; या हक्कांची पायमल्ली करणारे सरकार बदलण्याचा अगर उलथून टाकण्याचा अधिकार लोकांना आहे,’ असे या जाहीरनाम्यात घोषित करण्यात आले.

वसाहतींना स्वातंत्र्ययुद्धात विजय मिळाला आणि १७८३ मध्ये इंग्लंडने त्यांचे स्वातंत्र्य मान्य केले. जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष झाले. तेरा वसाहतींनी १७८९ साली अमेरिकेचे संघराज्य स्थापन केले. ‘अमेरिकेची संयुक्त संस्थाने’ (U. S. A.) या नावाने हो देश ओळखला जाऊ लागला. अमेरिका हे पहिले लोकशाही, प्रजासत्ताक संघराज्य ठरले. जगात प्रथमच लिखित राज्यघटनेचा प्रयोग करण्यात आला.

अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धाने फ्रान्समधील क्रांतिकारकांना प्रेरणा तसेच एकोणिसाव्या व विसाव्या शतकांत वसाहतवादविरोधी लढ्यांसाठी हे स्वातंत्र्ययुद्ध स्फूर्तिदायी ठरले.

Leave A Reply

Your email address will not be published.

ITECH Marathi । Short poem on my india my pride Ashadhi Ekadashi 2022 अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी !