ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

अमावस्येच्या दिवशी चंद्र का दिसत नाही , जाणून घ्या |

अमावस्येच्या दिवशी चंद्र का दिसत नाही
unsplash.com

अमावास्या ही हिंदू पद्धतीतील चांद्रमासिक कालमापनातील तिसावी तिथी आहे. ज्यादिवशी(रात्री) पृथ्वीवरून, चंद्र दिसत नाही, ती तिथी अमावस्या असते. जाणून घेवू की ,अमावस्येच्या दिवशी चंद्र का दिसत नाही.  चंद्र सूर्याच्या अगदी जवळ असल्यामुळे तो दिवसा आकाशात असतो पण सूर्याच्या प्रकाशामुळे तो दिसत नाही. ज्या तिथीला चंद्र दिसत नाही, ती अमावस्या, अशी व्याख्या मिताक्षरेत सांगितली आहे.

अमावस्येचा उल्लेख ऋग्वेदात आढळत नाही. पण सूर्यग्रहण अमावस्येलाच होते आणि अनेक ज्योतिर्विदांच्या मते ग्रहणाचा उल्लेख ऋग्वेदात आढळतो . वेदात सूक्तात सूर्याला ग्रासणाऱ्या स्वर्भानूला अत्री ऋषींनी शोधून काढले, असे म्हटले आहे. यावरून अत्रीने सूर्यग्रहणाचे ज्योतिषशास्त्रदृष्ट्या स्पष्टीकरण केले, असे वाटते. त्याला अमावस्या ज्ञात असली पाहिजे.

अमावास्येचे तीन प्रकार आहेत.  सिनीवाली अमावास्या चतुर्दशी व अंशतः अमावास्या असेल तर त्या अमावास्येला दर्श अमावास्या, आणि अंशतः अमावास्या व अंशतः प्रतिपदा असेल तर कुहू अमावास्या म्हणतात.

महाराष्ट्र, गुजराथ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात अमावास्यान्त महिने असल्याने या प्रदेशातली प्रत्येक अमावस्या हा मध्य भारतात, पुढच्या महिन्यातल्या वद्य पक्षातला शेवटचा दिवस असतो. त्या महिन्यातला त्यांचा नंतर आलेला शुक्ल पक्ष महाराष्ट्रातल्या माहे शुक्ल पक्षाबरोबरच असतो.

Leave A Reply

Your email address will not be published.