Gurucharitra Parayan : संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कसे करावे ? मिळतील हे लाभ जाणून घ्या !

Gurucharitra Parayan : ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. वारकऱ्यांना ‘ज्ञानेश्वरी’ व ‘दासबोध’ प्रिय, नाथपंथीयाना जसा ‘नवनाथ भक्तिसार’ प्रिय, तसा दत्तभक्तांना ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ पारायणासाठी प्रिय आहे. जाणून घेऊयात ,संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कसे करावे ? याचे लाभ काय होतात ?
गुरुचरित्र पारायण कसे करावे ?
श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे . ईसवी सनाच्या १४व्या शतकात नृसिंह सरस्वती यांचा दिव्य व अदभूत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्य परंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहीला.
श्री गुरूंच्या चारीत्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभलाला श्रीगुरुकृपासंपन्न, सिद्धानुभवी लेखक, असा योग जुळून अल्यामुळे या समग्र ग्रंथास सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले अहे. हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र -वाचनाची विशिष्ट पद्धती आहे. त्याप्रमाणेच वाचन, पारायण व्हावे असे स्वतः गुरु चरित्र कार म्हणतात.
गुरुचरित्र पारायण संकल्प कसा करावा ?
अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून ह्मा ग्रंथाचे वाचन करावे वैविध्य पूर्ण अशा संकल्प पूर्तते साठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते , असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुभव आहे. त्या दृष्टीने अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचा सामान्य संकेत व नियम पुढीलप्रमाणे आहेत .
- वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे.
- वाचनासाठी नेहमी पूर्वा भिमुख वा उत्तरा भिमुखच बसावे.
- श्रीदत्तात्रायांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व तीत श्रीदत्तात्रायांना अवाहन करावे.
- सप्ताहात केवळ दूधभात. (मीठ-तिखट, अंबट, दही, ताक वर्ज. साखर घ्यावी. गूळ घाउ नये. गव्हाची पोळी (चपाती), तूप,साखर घेता येते.)
- रात्री झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू यातात, असा श्रद्धेने अनुष्ठान करणा-यांचा अनुभव अहे.
- वाचनाच्या काळात मध्येच असनावरून उठू नये किंवा दुस-याशी बोलू नये.
- सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात. कारण शुक्रवार हा श्रीगुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस होय.
- सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी, शक्य तर अठव्या दिवशी, सुपारीतून श्रीदत्तात्रायांचे विसर्जन करावे, आणि नैवेद्य, आरती करून, भोजनास सवाष्ण, ब्राम्हण सांगून सांगता करावी.