ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

जगातील फलोत्पादन शेती (Horticulture in the world)

Horticulture in the world: फळे, फुले व शोभेची झाडे यांची अत्यंत शास्त्रीय पद्धतीने लागवड करून उत्पादन घेतले जाते, त्या शेतीस फलोत्पादन शेती म्हणतात.

भूमध्य सागरी प्रदेश, युरोप व कॅलिफोर्निया हे फलोदयान करणारे पारंपरिक प्रदेश आहेत. मात्र आता बहुतांशी प्रमुख शहरांच्या जवळील छोटया पर्वतीय/डोंगराळ पट्टघांत शहरांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी फलोदयान शेती केली जाते.

उष्ण कटिबंधीय प्रदेशात आंबा, काजू, नारळ, केळी; तर समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशात सफरचंद, पीच, अक्रोड, अंजीर, द्राक्षे; तसेच काही प्रदेशांत संत्री, लिंबे ही फळे घेतली जातात. फळांबरोबरच ट्युलिप, गुलाब, झेंडू, मोगरा, ऑर्किड व इतर शोभेची फुलेही घेतली जातात. शेतीचा आकार लहान, शास्त्रीय पद्धतीने लागवड, एकेका रोपाची वैयक्तिक काळजी, रासायनिक खते व काचगृहे यांचा वापर, भांडवल, जलद वाहतूक सेवा ही फलोदयान शेतीची वैशिष्ट्ये आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !