IKEA : इकीया,जगातील सर्वांत मोठी फर्निचर रीटेल कंपनी !

IKEA: इकीया ही आंतरराष्ट्रीय गृहत्पादनांची व फर्निचर उत्पादनांची निर्मिती व विक्री करणारी खासगी रीटेल कंपनी आहे. ही कंपनी जगातील सर्वांत मोठी फर्निचर रीटेल कंपनी आहे. इंग्वार कांप्राद या १७ वर्षीय स्वीडिश तरुणाने इ.स. १९४३ साली ही कंपनी ची स्थापना केली होती . या कंपनीचे मुख्यालय हे देलफ या ठिकाणी नेदरलँड मध्ये आहे ,
एकेया चे जगभरातील 63 मार्केटमध्ये 470 IKEA स्टोअर्स आहेत . नार्थ अमेरिका मध्ये 69 ,युरोप मध्ये 276 आफ्रिका मध्ये 3 , ओशनिया मध्ये 11 तर आशिया मध्ये 111 स्टोअर्स आहेत . पहिले IKEA स्टोअर स्वीडनमधील Älmhult येथे 1958 मध्ये उघडले होते .भारतातील बंगलोर (नागसंद्र), येथे नवीन स्टोर आहे . जर्मनीमध्ये जगातील सर्वाधिक IKEA स्टोअर्स आहेत. सर्वात मोठे IKEA चे स्टोअर Pasay City, Philippines आहे.