International Yoga Day 2022 : आंतरराष्ट्रीय योग दिवस , योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा , महत्व आणि इतिहास !

International Yoga Day 2022: 21 जून रोजी भारतासह जगभरात 8 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार आहे. जगभरातील लोक जमतात आणि ठिकठिकाणी योग करतात आणि लोकांच्या मनात योगाबद्दल जागरुकता पसरवण्याचे काम करतात. वास्तविक, शरीर निरोगी ठेवण्यासाठी योगासने अत्यंत आवश्यक आहेत. योगामुळे माणूस निरोगी राहतो, तसेच तंदुरुस्त राहिल्यास त्याला दीर्घायुष्य लाभते. मानवी जीवनातील योगाचे महत्त्व पाहून 2015 पासून जगभरात 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे.
जागतिक योग दिन शुभेच्छा !
मनशक्ती आणि शरीराला सकारात्मक उर्जा मिळवण्याचे तंत्र म्हणजे योगा…दैनंदिन योगा…निरोगी आयुष्य उपभोगा. जागतिक योग दिन शुभेच्छा..
जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा ! जागतिक स्तरावर योग आणि त्याचे महत्त्व पोहचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन 2015 साली सुरू करण्यात आला . त्यानंतर, आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो.
योग हा निरोगी जीवन शैली जगण्याचा एक मार्ग आहे.चला योगा करूयात,निरोगी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करूयात.जागतिक योग दिनाच्या आपणा सर्वांना आरोग्यदायी शुभेच्छा..!!
जागतिक योग दिवस… शरीर, मन आणि आत्मा यांना जोडणारे विज्ञान म्हणजे योग… आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा…