Karjat: भोसे सेवा सहकारी सोसायटी वरती राष्ट्रवादी कॉंग्रेशचे वर्चस्व आ. रोहीत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रोकडेश्वर शेतकरी विकास पॅनेल विजय…

कर्जत: तालुक्यातील राजकीय दृष्टया महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या भोसे सेवा सहकारी सोसायटी वरती आ. रोहीत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रोकडेश्वर शेतकरी विकास पॅनेलने गेली पंचविस वर्षाची सत्ता पुन्हा एकदा प्रस्थापित केली आहे. कै. सुखदेव क्षिरसागर यांच्या गटातील रोकडेश्वर शेतकरी विकास पॅनेलचे श्री.आप्पासाहेब क्षीरसागर , श्री. अमोल खराडे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली होती. यावेळी सर्व १३ जागा भरघोष मताने विजयी झाल्या आहे. गेली पंचविस वर्षा पासून कै. सुखदेव क्षिरसागर गटाची सत्ता आहे.यावेळी या सोसायटी वरती एकहाती सत्ता आली आहे.
विजयी उमेदवार घनेश्र्वर किसन खराडे, कविता अप्पासाहेब क्षीरसागर , विकास निवूर्त्ती खराडे,संजय सोपान खराडे , नरसिंग भिमराव क्षीरसागर,रवींद्र बाबासाहेब ढोले, गणेश कांतीलाल पवार, लहू माणिक खटके,गणेश गोपाळ माळशिकारे,महादेव अंकुश महाडिक,ताराबाई पोपट क्षीरसागर,लता दामू शिंदे, शांताबाई बबन गाढवे आदी संचालक मोठ्या मतांनी विजयी झाले.
यावेळी बोलताना अप्पासाहेब क्षीरसागर व अमोल खराडे म्हणाले ,येणाऱ्या काळात कर्जत जामखेड चे आमदार रोहीत दादा पवार , जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गुंड,जिल्हा नियोजन समिती सदस्य पै. प्रवीण दादा घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहोत.