ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Karjat Rathytara 2022 : कर्जत रथयात्रा कधी आहे ? जाणून घ्या ! ‘संत गोदड महाराज रथयात्रा’ महत्व ,इतिहास आणि मान्यता

Karjat Rathytara 2022
Karjat Rathytara 2022

Karjat Rathytara 2022: कर्जतचे ग्रामदैवत गोदड महाराज यांची रथयात्रा प्रत्येकवर्षी आषाढ महिन्यामध्ये कामिका एकादशीला गोदड महाराज यांची रथयात्रा भरते. या वर्षी दिनांक २४ जुलै २०२२ रोजी कामिका एकादशी आहे याच दिवशी  रथयात्रा होणार आहे .

 

कामिका एकादशी च्या दिवशी , पंढरपूर वरून विठ्ठल संत गोदड महाराज याना भेटण्यासाठी येतात अशी आख्ययिका आहे .

गोदड महाराज यांची रथयात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक राज्याच्या कानाकोपऱ्यामधून येत असतात. ही यात्रा दोन दिवस असते. यामध्ये पहिल्या दिवशी रथयात्रा आणि दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा जंगी हगामा असतो. या कुस्त्यांसाठी नगर, पुणे, सोलापूर, बीड, सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यामधील नामांकित पहिलवान येत असतात. यामुळे प्रेक्षणीय कुस्त्या पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते.

कोण होते संत गोदड महाराज ?

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे गोदड महाराज यांचा जन्म शके १६८१ श्रावण शुद्ध दशमी, गुरुवारी झाला. महाराजांचे जन्मनाव “अमरसिंह” होते .वडिल भिकाजी हे राजस्थानातील उदयपुर संस्थान येथील पराक्रमी राजवंशातिल होते तर आई चंद्रभागा ही कर्जत येथील तोरडमल कुटुम्बातिल होती. अमरसिंह वयाने सहा सात वर्षाचे असतानाच त्यांच्या मनात वैराग्याची भावना निर्माण झाली, मला विट्ठालानेच मुक्त केले असे त्यांना वाटले दगडाचेच टाळ करून ते विट्ठल नाम गाऊ लागले, त्याचवेळी विट्ठलभक्ति हाच ध्यास त्यांना लागला होता, एके दिवशी अमरसिंह फिरता फिरता त्यांची भेट पैठणचे संत एकनाथ महाराज यांचे शिष्य परंपरेतील शिष्य “नारायणनाथ” यांच्याशी झाली. त्यांनी अमरसिहाला आनंद साम्प्रदयाची दीक्षा दिली व आपल्या जवळची गोधडी अमरसिहाच्या अंगावर टाकुन सांगितले की आता यापुढे तुझे नाव “गोदडनाथ” (गोदड महाराज).

 

श्री गोदड महाराज यांची दिंडी पंढरपुर येथे गेली असता तेथे ते भजन किर्तनात रंगले, त्यावेळी एक ऊच्च कुलीन स्त्री चंद्रभागा नदीवर पाणी भरण्यासाठी घागर घेउन आली असता तिचा पाय महाराजांच्या तम्बुच्या दोरीला अडकून ती पडली त्यामुळे चिडून गोदड महाराजांना बोलली, हे त्यांना सहन झाले नाही व त्यांनी आपले सर्व साहित्य, रथ, पताका, तम्बू इत्यादि चन्द्रभागेच्या वाळवंट या ठिकाणी अग्नीत पेटून दिले व या आत्मक्लेशामुळे स्वतः ही देहात्यागाची तयारी केली ते अग्निमधे उडी टाकणार इतक्यात त्या गर्दीतून वाट काढीत प्रत्यक्ष पांडुरंग ब्राह्मणवेशात आले व श्री गोदड महाराजांना म्हणाले आपण आपल्या जन्मगावी कर्नग्राम (कर्जत) येथे जाउन संजीवन समाधी घ्यावी.

आषाढ़ कृष्ण एकादशीस प्रतिवर्षी रथोत्सव साजरा करावा. त्याच दिवशी स्वतः पांडुरंग येउन तुम्हाला भेट देइल असे सांगुन  ब्राह्मण वेषातील पांडुरंग गुप्त झाले, दरम्यान विविध ठिकाणी भ्रमंतिनंतर महाराजांनी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत गावी म्हणजेच स्वत:च्या आजोळी एक पत्र देऊन तेथील पाट्लास असे लिहिले की कर्जत ही आमची जन्मभूमि आहे जर आपली इच्छा असेल तर आम्ही तेथे येऊ. ते पत्र पाहून कर्जतचे तोरडमल पाटिल यांना अत्यंत आनंद झाला.

त्यांनी महाराजांचे वास्तव्य असलेल्या फलटन या गावावरून मोठ्या प्रेरणेने कर्जत येथे आणले कर्जत येथे श्री गोदड महाराज चांगलेच रमले. त्यांनी लोक कल्याणार्थ “योगसिध्धांत, “जगतारक” “संतविजय”, “योगनिर्माण”, “गोदड रामायण” इत्यादि ग्रंथांची रचना केली. एके दिवशी महासाध्वी उमाबाई शिम्पिनिच्या हस्ते दूध प्राशन करून शके १७५९ माघ कृष्ण चतुर्थी मंगलवार रोजी माधान्य समई कर्जत येथे संजीवन समाधी घेतली. ज्या जागी सद्गुगुरू श्री गोदड महाराज तपश्चर्येस बसायचे त्याच जागी त्यांचे भव्य दिव्य असे मंदिर उभे आहे. महाराजांनी आपला अवतार संपवला असला तरी आजही ग्रंथांच्या रुपाने त्यांचे कार्य सुरूच आहे. सालाबाद प्रमाणे सद्गुरु गोदड महाराजांच्या पुन्यतिथिनिम्मित कर्जत येथे भव्य अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो. तर आषाढ कृष्ण एकादशीस भव्य रथयात्रा असते. महाराजांच्या जन्मस्थळावर ही मंदिर उभारण्यात आले असून येथे व समाधी मंदिराजवळ  जन्मोत्सवाचा ही कार्यक्रम होतो.

काही मजकूर (समृद्ध कर्जत )

Leave A Reply

Your email address will not be published.