पहिला पाऊस|पहिला पाऊस कविता| पहिला पाऊस मराठी कविता
पहिला पाऊस|पहिला पाऊस कविता| पहिला पाऊस मराठी कविता

आला पहिला पाऊस..
आला आला पाऊस.. आला आला पाऊस…
माझ्या धरणी मातेची चिंब भिजवीत कूस। आला पहिला पाऊस ॥
वाहतोय सोसाट्याचा वारा। वरून पडतायेत टपोऱ्या गारा।।
नदी नाले तुडुंब भरले । सारं शिवारं हे भिजले ॥
न्हाऊन निघाला निसर्ग सारा। मोर नाचतोय फुलवून पिसारा।।
चातकं पितय पाणी । पाखरे गातायेत मंजुळ गाणी ॥
पावसाच्या सरीनं जमीन थंड गार झाली ।
वरुणराजा च्या कृपेने हिरवी समृद्धी आली ॥
पावसात मुले मस्त भिजतायेता कागदी होड्या पाण्यात सोडतायेत ।।
धबाधबा दिसतोय जणू दूधाचा झरा सर्वत्र वाहतोय सोसाट्याचा वारा।
सगळीकडे दरवळतोय ओल्या मातीचा सुवास जागाचा पोशिंदा करतोय वर्षा राणी ची आरास।। ।
गोट्यातल वासरू हंबरतय फुलपाखरू समदीकडं बागडतय ।
ढगांचा गडगडाट
वीजांचा कडकडाट धो धो कोसळतोय हा पाऊस ।
चहा आणि कांदा भजी सोबत आनंद देतो हा पाऊस पावसात भिजण्याची असते भारी हाऊस
आला आला पाऊस.. आला आला पाऊस…
– वैभवी कपिल दळवी.