ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

सावंतवाडी राजवाडा माहिती (Sawantwadi Palace Information)

सावंतवाडी राजवाडा माहिती
सावंतवाडी राजवाडा माहिती

Sawantwadi Palace Information:  सावंतवाडी राजवाडा सिंधुदुर्गातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ ओळखले जाते. राजवाड्याची बांधणी खेम सावंत भोसले संस्थानांनी १७५५-१८०३ या काळात केली होती . सावंतवाडी शहरातील हे सुंदर पर्यटन स्थळ असून मुंबई,पुणे, तसेच कोल्हापूर येथून महामार्गाने येथे पोहोचता येते .

सावंतवाडीचा इतिहास 

सावंतवाडी हि स्वातंत्र्यपूर्व काळातील सावंतवाडी संस्थानाची राजधानी. येथे भोंसले घराण्याची सत्ता होती. १९४७ साली ते भारतीय प्रजासत्ताकात विलीन झाले. आधी सावंतवाडी संस्थान आजच्या उत्तर गोवा मधील पेडणे, डिचोली, सत्तारी पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ ते वेंगुर्ला पर्यंत पसरलेले होते. पेडणे, डिचोली, सत्तारी हे नंतर पोर्तुगीजानी आपल्या साम्राज्याला जोडले, आणि नंतर गोवा मध्ये विलीन झाले.

सावंतवाडी राजवाडा कधी बांधण्यात आला ?

हा राजवाडा १७५५ ते १८०३ या काळात बांधण्यात आला. हा राजवाडा सध्या तीन भागात विभागला गेलेला आहे. सध्याच्या राजघराण्यातील लोकांचे राहण्याचे ठिकाण, राज दरबार आणि म्युसिअम.राजवाडा बघण्यासाठी २० रुपये तिकीट आहे. सोबत एक गाईड तुम्हाला राजवाडा दाखवतो.

राजवाड्यात असणाऱ्या काही खास गोष्टी !

राजवाड्याचा निवासी भाग सोडला तर इथं अतिशय सुंदर संग्रहालय पाहता येते. राजघराण्यातील लोकांच्या वापरातील वस्तू, इतर सांस्कृतिक वारसा, शस्त्रे, शिल्प-संग्रह अशा अनेक गोष्टींनी हे संग्रहालय समृद्ध आहे. इथं पाऊल ठेवताच चौकोनी रचना दिसते आणि मागे डौलात उभे असलेले माड दिसतात. कोकणी बांधकामातील साधेपणाचे सौंदर्य फारसे परिचित नसले तरीही परिणामकारक आहे हे इथं जाणवते.

राजवाड्यातील दरबार हॉल अतिशय भव्य आणि देखणा आहे. इथली झुंबरे, लाकडी कोरीवकाम अगदी निरखून पाहिलं पाहिजे. राजचिन्हे, शासकांच्या प्रतिमा, सिंहासन, लोखंडी कमानींवर तोललेला छज्जा, वेगळ्या धाटणीचे छत हे सगळं पाहिलं की अजून एक विलक्षण गोष्ट न विसरता अनुभवली पाहिजे. ही गोष्ट आजही या राजवाड्याला जागृत ठेवत आहे.

सावंतवाडी लाकडी खेळणी, रंगकाम, गंजिफा इत्यादीसाठी प्रसिद्ध आहे. खेम-सावंत राजघराण्याच्या आश्रयाने आजही इथं अगदी पारंपरिक पद्धतीने गंजिफा हा पत्त्याचा खेळ तयार केला जातो. अनेक कलाकारांना इथं काम तर मिळतेच आणि कोकणाचा मानबिंदू असलेल्या हा कलेचे संवर्धनही होते. ही चित्रे कशी काढतात, कशी रंगवतात, नवे कलाकार हे सगळं कसं शिकतात हे आपण इथं पाहू शकतो

Leave A Reply

Your email address will not be published.

Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !
Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !