Shahu Maharaj Jayanti 2022 HD Images: राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त Messages, Wishes | शाहू महाराज जयंती शुभेच्छा
Shahu Maharaj Jayanti 2022 HD Images: छत्रपती शाहू महाराज, हे समाजसुधारक व कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती होते. शाहू महाराजांचा जन्म २६ जून इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. शाहू महाराजांचे मूळ नाव हे यशवंत असे होते , शाहू महाराजांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव तर आईचे नाव राधाबाई होते.शाहू महाराजांनी बहुजन गोरगरीब समाजात शिक्षण प्रसाराचे काम केले . शाहू महाराजांची कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले होते . स्त्री शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी राजाज्ञा देखील काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. (राजर्षी शाहू महाराज जयंती )
राजर्षी शाहू महाराज जयंती शुभेच्छा
