ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

धक्कादायक ! नागालँडमध्ये दुर्मिळ पक्षी हॉर्नबिलची निर्घृण हत्या , जाणून घ्या ;हॉर्नबिल पक्ष्यांबद्दल !

नागालँडमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका दुर्मिळ भारतीय हॉर्नबिल पक्ष्याचा क्रूरपणे छळ करून मृत्यू झाला होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वन्यजीव विभागाने या प्रकरणाची दखल घेतली आहे .

hornbill bird
great hornbill hornbill bird

Shocking Viral Video: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (इंस्टाग्राम ) वर शेअर केलेल्या व्हायरल व्हिडिओच्या आधारे नागालँड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक दुर्मिळ हॉर्नबिल पक्ष्याला लोक काठीने मारताना दिसत आहेत . ही घटना नागालँडमधील वोखा जिल्ह्यातील घडली आहे . आपण या हॉर्नबिल पक्षी माहिती मराठी पाहुयात .

हॉर्नबिल पक्षी माहिती मराठी (Hornbill Bird Information Marathi)

आपल्या कडे मराठीत याच हॉर्नबिल पक्ष्याला मलबारी धनेश, गरुड धनेश किंवा राज धनेश या नावांनीही ओळखले जाते. अतिशय सुंदर रंगांनी हा पक्षी लक्ष वेधून घेतो. विविध प्रकारची फळे हे त्याचे मुख्य खाद्य आहे. झाडाच्या ढोलीत तो घरटे बांधतो .या पक्ष्यांची चोच फार मोठी व सिंगासारखी असल्यामुळे यांना इंग्रजी भाषेत हॉर्नबिल हे नाव दिलेले आहे. या पक्ष्यांचे एकंदर स्वरुप असामान्य असते. ब्यूसेरॉटिड़ि या पक्षिकुलात यांचा समावेश केलेला आहे. आफ्रिकेत सहाराच्या दक्षिणेस व दक्षिण आशियात भारतापासून फिलिपाईन्स बेटांपर्यंत ते आढळतात. ऑस्ट्रेलियात मात्र ते नाहीत यांच्या एकूण सु. ४५ उपजाती आहेत.

हे पक्षी घनदाट जंगलांमध्ये राहतात ,मोठ्या आणि उंच झाडांवर थवे करून ते राहतात ,याच्या पंखांचा होणारा आवाज दीड किमी. वर तरी ऐकू जातो. झाडावर स्वस्थ न बसता हे ओरडून गोंगाट करीत असतात. हे पक्षी वड,पिंपळ अशी फळे हा जरी यांचा मुख्य आहार आहे पण ते किडे, सरडे किंवा इतर अन्न खात असल्यामुळे त्यांना सर्वभक्षी म्हणतात . ते पदार्थ चोचीने वर उडवून आ वासतात व तो घशात पडला म्हणजे गिळतात.

धनेश पक्षी माहिती मराठी (great indian hornbill bird information in marathi)

1 Comment
  1. Nice answers in return of this question with solid arguments and telling everything regarding that.

Leave A Reply

Your email address will not be published.

Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !
Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !