ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

PMPML News : थोडा संशय आला म्हणून कंडक्टर ला विचारले काय प्रकार आहे ? काय झालं वसंत मोरे यांच्या सोबत जाणुन घ्या !

वेळ रात्री ११ : ४५ ची
ठिकाण :- कात्रज कोंढवा राजस चौक

मी काल नेहमी प्रमाणे चौकातील भटक्या कुत्र्याना खायला घालायला गेलो तर एक pmpml ची बस पूर्ण लाईट लावून उभी होती आणि गाडीचा कंडक्टर गाडी भोवती फिरत होता ड्रायव्हर त्याच्या ड्रायवर सीट वर बसून होता,

थोडा संशय आला म्हणून कंडक्टर ला विचारले काय प्रकार आहे ?

तेव्हा ते बोले की आम्ही सासवड वरून आलोत गाडीत एक महिला आहे तिला छोटे बाळ आहे त्या इकडेच बाजूला राहतात निघताना सांगितले होते की त्यांना राजस चौकात त्यांचा दिर घ्यायला येईल,

आम्हाला धड गाडी सोडता येईना आणि त्यांना पण आता रिक्षा ही मिळत नाही.

पण १५ मिनिटं झाले कोणचं येत नाही आणि फोन लागत नाही…

त्यांचा दिर नाही आला म्हनून काय झाला मीच त्यांचा दिर झालो त्या ताईला गाडीत घेतले आणि सुखरूप घरी पोचवले…

घराच्या दारात पोचवले म्हणून फोटो ही काढला पण खरे धन्यवाद त्या MH 12 RN 6059 बस च्या ड्रायव्हर आणि कंडक्टर ला…

त्यांनी इतक्या रात्री त्या ताईला एकटी उतरू नाही दिली…

त्या दोघांची नावे “नागनाथ नवरे” आणि “अरुण दसवडकर” अशी आहेत

(सदरची पोस्ट ही मनसे नेते वसंत मोरे यांच्या वाॅलवरुन घेण्यात आली आहे)

जनसेवा हीच-ईश्वर सेवा
या उक्तीप्रमाणे
Pmpml मधील माझे कर्तव्यदक्ष सहकारी वाहक-चालक यांनी आपले कर्तव्य ज्या प्रकारे निभावले यामुळे यांच्या वर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत असुन मी देखील सर्व कामगारांच्या वतीने या दोघांचेही अभिनंदन करतो
– संतोष शिंदे
पीएमपीएमएल राष्ट्रवादी कामगार युनियन

Leave A Reply

Your email address will not be published.

Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !
Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !