मेवाडचे तेरावे सर्वात महान राजा ,10 महिलांशी लग्न केले एकुण 17 मुले ! जाणून घ्या !

Maharana Pratap Jayanti : राजस्थानचे शूर पुत्र, एक महान योद्धा आणि अद्भूत शौर्य आणि धैर्याचे प्रतीक महाराणा प्रताप (Maharana Pratap) यांची जयंती 9 मे 2022 रोजी आहे. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार, महाराणा प्रताप यांचा जन्म ९ मे १५४० रोजी कुंभलगड किल्ल्यात (पाली) झाला. मात्र राजस्थानमधील राजपूत समाजातील एक मोठा वर्ग त्यांचा वाढदिवस हिंदू तिथीनुसार साजरा करतो. महाराणा प्रताप यांनी त्यांच्या आईकडून लढण्याचे कौशल्य शिकले होते. देशाच्या इतिहासात हळदीघाटीच्या लढाईची नोंद आजही वाचायला मिळते. राजा महाराणा प्रताप आणि मुघल सम्राट अकबर यांच्यातील हे युद्ध अतिशय विनाशकारी होते.
महाराणा प्रताप यांचे बालपण
महाराणा प्रताप यांचा जन्म कुंभलगड किल्ल्यात झाला असल्याचे संगितले जाते , कारण महाराणा उदाईसिंग आणि जयवंताबाई यांनी कुंभलगड राजवाड्यात लग्न केले होते. याबाबत दुसरे मत असे आहे की , त्यांचा जन्म मारवाड मधील पालीच्या वाड्यांमध्ये झाला. महाराणा प्रतापच्या आईचे नाव जयवंत बाई असून त्या पालीच्या सोनगरा अखैराजची मुलगी होत्या.
महाराणा प्रताप यांच्या विषयी काही खास
- महाराणा प्रताप यांचे बालपण भिल्ल समुदायाबरोबर गेले होते. त्यांनी भिल्लांकडून मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतले होते.
- महाराणा प्रताप यांनी जरी मुघलांशी अनेक लढाया केल्या, परंतु सर्वात ऐतिहासिक लढाई म्हणजे हल्दीघाटीची लढाई ज्यामध्ये ते मानसिंगच्या नेतृत्वाखालील अकबराच्या प्रचंड सैन्यासमोर आले.
- 1576 च्या या जबरदस्त युद्धात महाराणा प्रताप यांनी सुमारे 20 हजार सैनिकांसह 80 हजार मुघल सैनिकांचा सामना केला.
- महाराणा प्रताप यांच्या भाल्याचे वजन 81 किलो होते, तसेच त्यांच्या छातीचे चिलखत 72 किलो होते. भाले, चिलखत, ढाल आणि दोन तलवारींसह त्याच्या शस्त्रास्त्रांचे वजन 208 किलो होते.
- 1596 मध्ये, शिकार खेळताना, त्याला एक दुखापत झाली ज्यातून तो कधीही बरा झाला नाही. 19 जानेवारी 1597 रोजी वयाच्या 57 व्या वर्षी चावड येथे त्यांचे निधन झाले.