ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Vat Purnima 2022 Date: वटपौर्णिमा कधी आहे ? वटसावित्री व्रताचा शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व

वटपौर्णिमा
वटपौर्णिमा

Vat Purnima 2022 Date: भारतात वर्षभर अनेक सण साजरे केले जातात. प्रत्येक सणांच विशिष्ट असं महत्व आहे.  वट पौर्णिमा जेष्ठ महिन्यातल्या येणाऱ्या पौर्णिमेला वट पौर्णिमा असे म्हणतात.वट सावित्री व्रत (Vat Savitri Vrat) ला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या वेळी हा सण 14 जून रोजी साजरा होणार आहे.

सावित्रिने कसे हुशारीने यमाच्या मागे जाऊन आपल्या पतीचे म्हणजे च सत्यवानाचे प्राण परत आणले होते ह्या क्षणाची आठवण ठेवून सर्व सुवासिनी या दिवशी वटसावित्रि चे व्रत करतात. आपल्या पती च्या दीर्घायुष्या साठी वडाच्या झाडाची पूजा करतात. वडा च्या झाडाचं आयुष्य फार मोठं असल्यामुळे आणि निसर्गाची पूजा करता यावी असा हि ह्या मागे हेतू असावा.मान्यतेनुसार, वटवृक्षात सर्व देवता वास करतात. वटवृक्षाच्या मुळाशी ब्रह्मा, देठात विष्णू आणि डहाळ्यांमध्ये भगवान शंकर वास करतात. या झाडाच्या तळाशी टांगलेल्या फांद्या सावित्री देवीचे प्रतीक मानल्या जातात.

हि पूजा कशी करतात ते आपण बघूया प्रथम विड्याची पाने सुपारी हळदी कुंकू वाहून गणेश पूजा करावी. मग वडाच्या झाडाला पाणी घालून आंब्याचा गड पूजावा. फुले व अगरबत्ती लावावी. झाडाच्या एका टोकाला सूत (धागा/दोरा) बांधून संपूर्ण झाडाला तो सूत गुंडाळून पाच, सात किंवा अकरा प्रदक्षिण घालाव्या. त्यानंतर वडा जवळच सावित्री ची ओटी भरावी. तूप साखरेचा नैवेद्य दाखवावा. आपल्या पती साठी व कुटुंबासाठी परमेश्वरा कडेअशी प्रार्थना करावी आणि हि पूजा करून झाल्यावर सुवासिनींची ओटी भरून त्यांना प्रसाद द्यावा.

सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी|

अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते |

तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्|

अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ||

वटपौर्णिमा मुहूर्त –

पौर्णिमा प्रारंभः 13 जून 2022 रोजी उत्तर रात्रौ 9 वाजून 03 मिनिटे.

पौर्णिमा समाप्तीः 14 जून 2022 रोजी सायं. 05 वाजून 22 मिनिटे

Leave A Reply

Your email address will not be published.

Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !
Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !