Vat Savitri Vrat Katha 2022: वटसावित्री व्रत कथा ।वटसावित्री व्रत कथा मराठी ।

Vat Savitri Vrat Katha 2022: वटसावित्री व्रत कथा ।वटसावित्री व्रत कथा मराठी ।
भद्र प्रदेशात अश्वपती नावाचा राजा होता एक.
त्याला कन्या झाली सावित्री सुरेख.
होती बाला ती सुंदर , देखणी व बहुगुणी.
खेळत होती उद्यानात राजनंदिनी.
पुढे सावित्रीला पती मिळाला सत्यवान, तोही होता सर्वगुणसंपन्न.
राजपुत्र तो सल्य राज्याच्या, धुर्मत्सेन अंध राजाच्या राजकुमार, होता तो राजबिंडा देखना कोमल असा सुकुमार.
पराभवामुळे राज्य गेले नशीबी आले वनवास
स्वाभिमानाने जगायचं आहे तर धरा उद्याची आस.
एक दिवस आपला येईल होता हा विश्वास, सोडली नाही जिद्दीची कास
सत्यवान अल्पायुषी आहे म्हणून सगळ्यांनी केले तिला (सावित्री) मणाई
सावित्रीने निवडले सत्यवानाला, ती मागे तर हटणार नाही
विवाह झाला संपन्न ,आली सावित्री सासरी (वनात)
आनंदाने दोघांनी केलं नवीन संसाराला सुरू
आणि अंध माता-पित्यांची सेवा पण सुरू
सावित्री होती स्वाभिमानी, तिने रचली स्वतःची कहाणी.
सत्यवानाचा मृत्यू तिन दिवसावर आहे कळताच, तीन दिवस उपवास करून सावित्रीने केले व्रत शुरू.
सत्यवान लाकडे तोडायला गेला वनात.
सावित्री पण गेली पतीच्या मागोमाग रानात
लाकडे तोडता तोडता सत्यवानाला घेरी आली, तो जमिनीवर पडला मृत्यु
ती दचकली पण नाही घाबरली.
ती पण यमाच्या मागे धाडसाने जाऊ लागली.
यमाने सावित्रीला परत जाण्यास खूप सांगितले.
पण सावित्रीने ते नाकारले.
यमाने कंटाळून पती सोडून सावित्रीला तीन वर मागण्यास सांगितले.
पण ती होती चतुर बाला, ती कशी सोडेल यमाला.
सावित्रीने सासूसासऱ्याचे ची दृष्टी व त्यांचे राज्य परत मागितले व आपल्याला शत पुत्र व्हावे अशे मागितले वरदान.
यमराज वदले तथास्तु. यमाला वचन दिल्याची झाली आठवण.
यमाने सावित्रीला परत दिला सत्यवानाचे प्राण .
राहिला पतिव्रता नारीचा अभिमान.
—‐—–
अर्थात: सत्यवानाचे प्राण सावित्रीने वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाखाली आणले म्हणून, जेष्ठ महिन्यात उपवास करून, वडाच्या झाडाची पूजा करतात वटसावित्री व्रत आचरतात.
“सावित्री ब्रह्म सावित्री। सर्वदा प्रिय भाषीनि|।
तेन सत्येन मा पाही दुःख संसार सागरात||
अवियोगे यथा देव सावित्र्या सतहितस्य तो।।
अतियोगे तथास्मकः भुयात जन्मनी जन्मान।।