कर्जत:संतश्रेठ श्री नरहरी सोनार महाराजांच्या पालखी सोहळ्याने रेहेकुरी मध्ये स्वागत !

कर्जत: पंढरीच्या वाटेवरील संतश्रेठ श्री नरहरी सोनार महाराजांच्या पालखी सोहळ्याने मंगळवार ( दि . २८ ) दुपारी १२ च्या सुमारास कर्जत तालुक्यातील रेहेकुरी गावच्या शिवारात प्रवेश केला . येथे फुलांची उधळण करत गळाभेट घेत दोन वर्षांनंतर सोहळ्यातील वारकऱ्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले .
यावेळी पालखी सोहळा चे अध्यक्ष सचिन कुलथे, रघुनाथ सोनांबेकर, अतुल कुलथे, अनिल कुलथे, बाळासाहेब कुलथे, सुभाष माळवे, हरीओम कुलथे, नितीन देशमुख, राम ढेरे यांच्या सह सोनार समाजासह इतर ही कर्जत शहरातील लोक उपस्थित होते.
AC Repairing : सुरु करा AC Repairing चा व्यवसाय ,होईल लाखोंची कमाई , जाणून घ्या कुठे आणि कसे शिकाल ?
समस्त दोन वर्षांनंतर पालखी सोहळा अनुभवता आल्याने वैष्णवजनांमध्ये मोठा उत्साह , आनंदाचे वातावरण आहे . यंदा पालखी सोहळ्याचे ३६ वे वर्ष आहे . पालखी सोहळ्याच्या सोबतीला आसमंतात घमणारा टाळ – मदंगांचा
गजर , देहभान विसरून विठ्ठल नामात दंग झालेले वारकरी , टाळ – मृदुंगांचा गजर करत चिपळ्यांच्या तालावर , कपाळी गंध , खांद्यावर भगवी पताका , गळ्यात टाळ , मुखाने हरिनाम अशा या वातावरणाने मंत्रमुग्ध झालेल्या लाखो तुकाराम महाराज वारकऱ्यांसह पालखी सोहळ्याचे मंगळवार ( दि . २८ ) सायंकाळी कर्जत येथील श्री संत नरहरी सोनार महाराज मंदिर मुक्कामासाठी
दाखल झाले आहेत.
आत्माराम बाबा मांदळी , आत्माराम बाबा मांदळी कर यांच्या विषयी माहिती !
श्री संत नरहरी सोनार महाराज पालखीतील वारकरी व इतर लोकांना अतुल कुलथे यांनी महाप्रसाद चे आयोजन केले होते. यावेळी वारकरी यांच्या बरोबरच इतरही लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.