ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

प्रेम म्हणजे काय ? (What is love?)

What is love: प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं; पण नेमकं काय असतं? फेब्रुवारी महिना येतोच मुळी प्रेमाच्या आगमनाची दवंडी देत. गुलाब, टेडी, चॉकलेट, ग्रीटिंग्ज, विविध भेटवस्तू यांसारख्या वस्तूंनी बाजारपेठा, दुकाने आणि साइट्स ओसंडून वाहू लागतात. अब्जावधी डॉलर्सच्या असतात या उलाढाली. यांचे मार्केटिंग, कॅम्पेनिंग खूप आधीपासून सुरू असते आणि याच चकव्याला माणूस भुलून जातो.

प्रेम हे कोणत्याही प्राण्यांशी , वस्तू , सजीव , निर्जीव ,इत्यादीबद्धल मनामध्ये आपुलकी , स्नेह , जिव्हाळा, आदर , निर्माण होने आणि ती गोष्ट सहवासात , जीवनात हवीशी वाटते यालाच तर प्रेम म्हणतात  , आपले दैनंदिन जीवन जगत असताना सहवासात येणाऱ्या कोणत्याही गोष्टीशी भावनिक ,मानसिक ,शारीरिक ,संबंध जोडले गेल्यामुळे निर्माण झालेला स्नेह म्हणजे प्रेम

प्रेमाची वयोगटानुसार स्वरूपे:

१) स्नेह – प्रेमाचा हा प्रकार आपण आपल्याहून वयाने लहान असणाऱ्या व्यक्तीसोबत ठेवतो. यात एक काळजी किंवा माया असते. भूतदया किंवा पशुपक्षांबद्दल वाटणारी आपुलकी हीसुद्धा ह्यात मोडते.

२) प्रेम – हा समान वयोगटातील व्यक्तींच्या दरम्यान असणाऱ्या संबंधांना दर्शवितो – ह्याचे उपप्रकार म्हणजे पत्नीप्रेम, भागीनिप्रेम, बंधुप्रेम, मित्रप्रेम इत्यादी.

३) आदर – हा प्रेमाचा प्रकार आपल्याहून वयाने मोठ्या अथवा ज्येष्ठ व्यक्तींकरता असतो. ह्यातही संबंधित व्यक्तीची वाटणारी काळजी – विशेषतः त्यांच्या आवडी-निवडी व विचारांची ठेवतात. ही वागणूक त्यांच्या जीवनाच्या अनुभवाची आणि त्यांनी आपल्या केलेल्या संगोपनाबद्दलची एक पावती आणि क्वचित प्रसंगी त्यांना आवडणाऱ्या शिस्तबद्ध दिनचर्येची दखल असू शकते. पण हे सर्व प्रेमच!

४) ममता – हा तो प्रेमप्रकार की ज्याला अनुभवायला असे म्हणतात की देवही अवतार घेतात. स्त्रीला मातृत्व प्राप्त झाले की आपल्या बाळासाठी वाटणारे प्रेम म्हणजे ममता होय.

५) भक्ती – प्रेमाचे परमोच्च रूप की ज्याचे वर्णन केवळ अशक्य. परमेश्वर आणि साधक जेंव्हा एकरूप होतात तेंव्हा जो प्रेमप्रकार घडतो तो म्हणजे भक्ती – भक्ती म्हणजेच एकरूपता. भिन्नता म्हणजे विभक्ती- परमेश्वर आणि भक्त दोघेही एकरूप होऊन आपापले वेगळे अस्तित्व घालवून परमोच्च एकरूपता अनुभवतात त्यासच भक्ती असे संबोधन आहे.

६) एकरुपता_ प्रेम म्हणजे दोन जीव,नाते, संबंधी, एकत्र येऊन विचाराची देवाण घेवाण करतात , त्याच्या विचारातील एकता म्हणजे प्रेम होय.

Leave A Reply

Your email address will not be published.

Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !
Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !