World Bicycle Day 2022: का कधी आणि कशा प्रकारे साजरा करतात ‘जागतिक सायकल दिन’ जाणून घ्या ?

World Bicycle Day 2022: वाहतुकीच्या सर्वात जुन्या साधनांपैकी एक आहे ती म्हणजे आपली सायकल , सायकलचा जगभरात वापर सुरू आहे. साधे पण अतिशय मजबूत लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत, सायकलिंग करायला मजा देते, तसेच, सर्वांसाठी आरोग्य फायदे देते. सायकलिंगचे हे फायदे लोकांना सांगण्यासाठी आणि सायकलच्या वापरासाठी प्रोत्साहन देण्यासाठी, ३ जून हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून साजरा केला जातो.. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) देखील यावर भर देते .
सायकल दिनाची सुरवात कधी झाली ?
जागतिक सायकल दिन पहिल्यांदा 3 जून 2018 रोजी साजरा करण्यात आला होता , जेव्हा संयुक्त राष्ट्रांनी एप्रिलमध्ये न्यूयॉर्क शहरातील संयुक्त राष्ट्र महासभेच्या 72 व्या नियमित सत्रादरम्यान एक ठराव स्वीकारला. ही घोषणा 193 हून अधिक सदस्य राष्ट्रांनी स्वीकारली ज्याने त्यांना प्रादेशिक, आंतरराष्ट्रीय आणि उपराष्ट्रीय विकास कार्यक्रम आणि धोरणांमध्ये सायकलींचा समावेश करण्यास प्रोत्साहित केले.
जागतिक सायकल दिनाचे महत्त्व ?
लोकांच्या कमी हालचालींमुळे होणारे विविध रोग या वाढत्या चिंतेमुळे जागतिक सायकल दिन अधिक महत्त्वाचा बनला आहे. सायकल हे वाहतुकीचे स्वच्छ, परवडणारे आणि पर्यावरणास पूरक साधन आहे आणि त्याच्या वापराला प्रोत्साहन देणे हे निसर्गाचे संवर्धन आणि स्वच्छ हवा आणि पर्यावरण साध्य करण्यासाठी योगदान देण्यासारखे आहे .