ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

पवना धरण (Pavana Dam) पवना धरण माहिती

Pavana Dam: पवना धरण भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पवना नदीवर असलेले धरण आहे.या धरणातून पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा केला जातो. पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणारे पवना धरण हे प्रमुख धरण आहे . पवना धरण विषयी महिती आपण पाहणार आहोत .

पवना धरण परिसरात मागील चोवीस तासात 75 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 4.28 टक्क्यांनी वाढला असून, धरणात एकूण 55.25 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.

 

पवना धरणाची क्षमता टीएमसीमध्ये

प्रकल्पीय : 10.76 टीएमसी
उपयुक्त : 9.67 टीएमसी

पवना धरणाची आजची पाणी पातळी

पवना धरण किती टक्के भरले

पवना धरण 55.25 टक्के भरले आहे .

वाघेश्वर मंदिर पवना धरण

हिमालयावर तांडव नृत्य करणारे शंभो महादेव धरणाच्या पाण्यात विसावले. गोंडस गणपती बाप्पाच्या मूर्त्यासुद्धा ह्या पाण्यात खोलवर गेल्या. ना कोणाला सुयर, ना कोणाला सुतक….. आता धरणाचे पाणी आटल्यामुळे हे मंदिर मी पाहवयांस गेलो. अवशेष, अवशेष आणि अवशेष चोहीकडे पाहताना नकळत अश्रू तराळले. तरीसुद्धा देव आहे, हे तिथे गेल्यावर कळले. तो शांत, निपचित स्वरूपात हे सर्व पाहतोय, असा भास होत होता. काय वाटत असेल त्याला ? गाभाऱ्यातील शिवलिंग खालील फोटोत पाहू शकता.

https://survesagar.wordpress.com/

संपूर्णतः दगडी चिऱ्यांत रचलेले हे मंदिर धरणात पूर्ण बुडत असल्यामुळे ते काही वर्षांचे सोबती आहे, हे पाहूनच वाटते कारण दगडी चिरांना चहू बाजूंनी क्षाराच्या थरांनी गाठले आहे. कळस उध्वस्त झाला असून मंडप फक्त बाकी आहे. चौकट वितानात असलेल्या ह्या मंदिराच्या वितानाच्या शिळा आज जागोजागी हललेल्या असल्यामुळे फटी निर्माण झाल्या आहेत. मंदिराच्या चहू बाजूंना प्रचंड प्रमाणात अवशेषांचा ढिगारा झाला आहे. अप्रतिम अशी दिपमाळ तिथे नक्की असेल हे आता तिथे पडलेल्या अवशेषांवरून कळते. नाल्याला छोटासा घाट त्यानंतर वाहनमंडप त्यात अगाध कोरीवकामाचा नमुना असलेला नंदी त्यानंतर मुखमंडप पुढे रंगमंडप असण्याची दाट शक्यता पुढे सभामंडप, अंतराळ आणि त्यानंतर दोन पायऱ्या उतरून गर्भगृह असे परिपूर्ण रचनात्मक भव्य मंदिर असेल. प्रवास करणारा वाटसरू नक्कीच इथे काहीवेळ विसावत असेल ह्यात शंका नाही. काय सांगता येते, छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगडवरून जाताना इथे दर्शन घेतले असेल ?

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

ITECH Marathi । Short poem on my india my pride Ashadhi Ekadashi 2022 अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी !