ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

अहमदनगर : पाठीवर दप्तराचे ओझे घेऊन चिखलवाट तुडवत विद्यार्थ्यांची वाटचाल !

अहमदनगर : कर्जत तालुक्यातील शिंपोरा – बाभुळगाव जंजीरे वस्ती खेड अंतर्गत येणाऱ्या येथील शालेय विद्यार्थ्यांना पाठीवर दप्तराचे ओझे घेऊन चिखलवाट तुडवत खेड येथील शाळा गाठावी लागत आहे . मागील अनेक वर्षांपासून रस्त्याचा हा प्रश्न कायम आहे . परंतु , याकडे ना लोकप्रतिनिधी लक्ष देताहेत ना प्रशासन.


बाभुळगाव -शिंपोरा जंजीरे वस्ती व खेड


या गावातील बहुतांशी लोक आपापल्या सोयीनुसार वस्त्यांवर वास्तव्य करतात . अशीच एक जंजीरे वस्ती आहे .ही वस्ती औटेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत असून जवळच खेड ग्रामपंचायत अंतर्गत जवळपास शंभर कुटुंबे
वास्तव्यास आहेत. याशिवाय जुना शिंपोरा
येथेही मोठ्या प्रमाणात वस्ती वस्तीवर कुटुंबे राहतात. तसेच आगवण वस्ती, काळे वस्ती, पाटील वस्ती येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी , यासाठी पालकांनी आपआपल्या परीने खेड, शिंपोरा येथील शाळेत शिक्षणासाठी रोज पाठवतात.येथील मुले पहिली ते चौथीपर्यंतच्या व पुढे बारावी पर्यंत च्या शिक्षणासाठी खेड येथे
सुविधा आहे .

 


जंजीरे वस्ती पासून खेड चे अंतर सरासरी तीन किलोमीटर पेक्षा जास्त आहे. खेड शिंपोरा हा रस्ता मुख्य रस्ता असल्याने या रस्ताचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. करमाळा बाभुळगाव शिंपोरा करपडी येथूनच लोक बारामती पुणे दैन्ड इंदापूर भिगवण येथे जाण्यासाठी जवळचा रस्ता म्हणून या रस्त्याला वाहनचालक प्राधान्य देतात . अवघ्या अर्धा पाऊन तासात पार होणाऱ्या रस्त्यावर दीड तास लागत आहे . खेड येथील युनियन बँक ऑफ इंडिया व सहकार बॅक असल्याने परिसरातील लोकांची वर्दळ या रस्त्यावर नेहमी असते.
असते .याशिवाय येथे मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्र असल्याने येथील सर्व ऊस हा अंबालिका व बारामती अॅग्रो या साखर कारखान्यांना जातो. आजूबाजूच्या परिसरातील व बाभुळगाव शिंपोरा करपडी खेड येथून मोठ्या प्रमाणात ऊसाची वाहतूक होत असल्याने व याच रस्त्याने वाळू वाहतूक ही होते त्यामुळे हा रस्ता अतिशय खराब झाल्यामुळे लोकांना फारच त्रास होतो आहे.
रस्त्यांची झाली चाळण दादा… काय रस्ते , आमची ऐसीतैशी ; तरी सगळे ओक्के ?

 

शिंपोरा खेड या रस्त्यावर फुटांचे खोल खड्डे पडले आहेत . वाहनचालकांना या धोकादायक खड्ड्यांमधून वाट काढत प्रवास करावा लागत आहे .विद्यार्थ्यांना तीन किमीची ही चिखलवाट तुडवत खेड गाठावे लागते . एवढेच नाहीतर , पावसाळ्यात वस्तीवर दुचाकीही जात नाही . त्यामुळे कोणी आजारी पडले तर त्यांना
बैलगाडीतून दवाखान्यात न्यावे लागते . असे असतानाही या प्रश्नाकडे लक्ष द्यायला कोणीही राजी नाही . प्रत्येक वेळी आश्वासन दिले जाते . परंतु , त्याची आजवर पूर्तता झाली नाही .
मध्यंतरी निवडणुकीच्या काळात रस्ता मंजूर झाल्याचे सांगण्यात आले होते .

 

वर्गणी गोळा करून रस्ता दुरूस्ती. …


खेड येथील बागायतदार पोपट प्रभाकर पाटील यांनी या रस्त्यावरील ऊस वाहतूक करणारे शेतकरी
याच्या कडून व स्वता:चे पैसे घालून ऊस वाहतूक करता यावी म्हणून शिंपोरा खेड या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठे खड्डे बुजवून व रस्त्यावर मुरूम टाकून ऊसाची वाहतूक सुरळीत करण्यासाठी ़आपले योगदान दिलेले आहे. जर मुरूम टाकला नसता तर अनेकांना आपला ऊस कारखान्यांना घालता आला नसता

Leave A Reply

Your email address will not be published.