ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Bangladesh: रेल्वे क्रॉसिंगवर भीषण अपघात, बारावीच्या 11 जणांचा जागीच मृत्यू

Bangladesh Train Accident: बांगलादेशमध्ये गंभीर अशी घटना घडली आहे ट्रेनच्या धडकेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचा समावेश आहे. हे सर्व लोक मायक्रोबसमधून धबधबा पाहून परतत होते ही घटना घडली. ही घटना चट्टोग्रामच्या मिरशारे उपजिल्हामधील आहे. घटनेच्या वेळी रेल्वे क्रॉसिंगचे गेट उघडे होते, त्यामुळे चालकाचे ट्रेनकडे लक्ष नव्हते. अपघातानंतर ट्रेनने बसला एक किलोमीटरपर्यंत फरफटट नेले.

मृत्यू झालेल्या 9 प्रवाशांची ओळख पटली असल्याचे पोलिसांनी सांगितलेआहे . सर्व मृत हे हातहजारी उपजा येथील अमन बाजार परिसरात असलेल्या आर अँड जे प्लस नावाच्या कोचिंग सेंटरचे विद्यार्थी आणि शिक्षक होते. जिसान, साजिब, राकीब आणि रेडवान अशी मृत्यू झालेल्या चार शिक्षकांची नावे आहेत. उर्वरित पाच जणांची नावे हिशाम, आयत, मारुफ, तस्फिर आणि हसन विद्यार्थी अशी आहेत. हे सर्वजण एसएससी आणि बारावीची तयारी करत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.