गुरुपोर्णिमा निमित्त शिक्षकांना ,शुभेच्छा पत्र
शुभेच्छा पत्र (good wishes letter)

आदरणीय भुजबळ मॅडम, साष्टांग नमस्कार
सौ. भुजबळ मॅडम सर्वप्रथम तुम्हाला माझ्याकडून गुरू पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. मॅडम इयत्ता १ली ते ४थी पर्यंत तुम्ही आम्हाला वर्गशिक्षिका म्हणून लाभल्या. या चार वर्षात तुम्ही माझ्या जीवनाला आकार दिव्या हयाच चार वर्षाच्या प्रवासात अगदी आयुष्यभरासाठी तुम्ही मला अतिशय उत्तम शिकवण दिव्यी. नेहमी आई सारखी माया केलीत. तुम्ही खूप चांगल्या आहात.
तुमच्या मुळे मला शालेय जीवनातल ज्ञान प्राप्त झालं. माझा १० वा वाढदिवस असताना तुम्ही मत्या दिवेल गिफ्ट, शिक्षणाच्या बाबतीत उत्तम मार्गदर्शन तसेच, मी दहावीत असताना पुन्हा शाळेत प्रवेश तुम्हीच मिळवून दिला हे सगळ खूप महत्त्वाच आहे माझ्यासाठी.
माझ्या सगळ्यात लाडक्या, प्रिय, आणि आदरणीय शिक्षिका तुम्ही आहात. आजच्या या गुरूपौर्णिमेदिवशी तुम्हाला मी वंदन करते. व माझ काही चुकल असेल आतापर्यंत तर त्याबद्दल तुमची मनापासून माफी मागते.
‘गुरुबम्ध गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर: गुरु: साक्षात् परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नम:
तुमची शिष्या ——-