ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

कर्जत तालुक्यात आषाढी एकादशी दिवशी बकरी ईद साजरी न करण्याचा निर्णय , मुस्लिम समाजाचे कौतुक!

कर्जत तालुक्यात आषाढी एकादशी दिवशी बकरी साजरी होणार नाही.

कर्जत
कर्जत

कर्जत : आषाढी एकादशी (Ashadi Ekadashi) च्या दिवशी बकरी ईद (Bakri Eid) हा मुस्लिम समाजाचा सण येत असल्याने आषाढी एकादशी च्या दिवशी मुस्लिम समाजाने ईदचा कुर्बानी (Sacrifice of Eid) चा कार्यक्रम कर्जत तालुक्यात न करता तो दुसऱ्या दिवशी करण्यात येणार आहे अशी माहिती नगरसेवक मुस्लिम समाजाचे नेते रज्जाकभाई झारेकरी यांनी दिली.
झारेकरी पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचे दैवत पंढरीचा विठ्ठल यांची आषाढी एकादशी ही महाराष्ट्रातील सर्व समाज मोठ्या मनोभावे वातावरणात साजरी करत असतो. तर कर्जत ही नगरी धाकटी पंढरी म्हणून सर्वत्र सुपरिचित आहे. नगर जिल्हा हा संताचा जिल्हा म्हणून आोळखला जातो. तर गोदडमहाराज व कर्जत तालुक्यात राशीन व कुळधरण येथील जगदंबा देवी व सिध्दटेक येथील गणपती मंदिर हे तालुक्याचे भुषण आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाने बकरी ईद चा सण ११/७/२०२२रोजी साजरा करावा असे आवाहन ही झारेकरी यांनी केले आहे.

 

रज्जाकभाई झारेकरी यांनी बकरी ईद चा सण हा आषाढी एकादशी दिवशी न करता दुसऱ्या दिवशी करावा यासाठी मुस्लिम समाजाची बैठक घेतली होती. या बैठकीत सर्व मुस्लिम समाजाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या निर्णयामुळे हिंदू समाजाने मुस्लिम समाजाचे कौतुक करत धन्यवाद दिले.

रज्जाकभाई झारेकरी
रज्जाकभाई झारेकरी
Leave A Reply

Your email address will not be published.

ITECH Marathi । Short poem on my india my pride Ashadhi Ekadashi 2022 अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी !