शेतकरी मित्रांनो तुमची जनावरे आजारी तर नाहीत ना? जाणून घ्या ‘या’ सोप्या मार्गाने…
तुमचा प्राणी आजारी आहे की नाही असे ओळखा
मुंबई : शेतकरी जोडव्यवसाय म्हणून दुगधव्यवसाय करत असतात. दुग्धव्यवसायातून शेतकरी चांगले उत्पन्न घेत असतो. परंतु काही कारणाने अचानक गायी कमी दूध देतात तेव्हा पशूपालकांनी जनावरांची वेळेत काळजी घेण्याची गरज असते.
सध्या राजस्थानातील पशुपालक जनावरांच्या लंपी आजाराने त्रस्त आहेत. येथे अनेक गुरांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आहेत. अशावेळी परिस्थितीत ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. प्राण्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. तुमचा प्राणी आजारी आहे की नाही कसे ओळखाल? याविषयी सविस्तर माहिती घेऊया.
लक्षणे अशी ओळखा
1) शेतकरी मित्रांनो तुम्हाला प्राण्याच्या वर्तनावर लक्ष ठेवावे लागेल. तुमचा जनावरं नीट चालत आहे का ते तपासा. जर त्याला चालताना त्रास होत असेल तर समजून घ्या की जनावर आजारी आहे.
2) प्राण्यांची क्रिया दर्शवते की ते आजारी आहेत की नाहीत.
3) जेव्हा एखादा प्राणी कमी सक्रिय दिसतो तेव्हा समजून घ्या की त्याला काही आरोग्य समस्या असू शकते. अशावेळी जनावरांची वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे आहे. तापमान तपासून, प्राणी आजारी आहे की नाही हे तुम्ही सहज शोधू शकता.
4) जर तुमचे जनावर अचानक कमी खायला लागला असेल तर कदाचित ते आजारी असेल. तसेच प्राणी अन्न चांगले चावत नसले किंवा हळू हळू चावत असले तरीही ते आजारी असण्याची शक्यता असते.
5) प्राण्यांमध्ये ही लक्षणे दिसल्यास ताबडतोब एखाद्या चांगल्या पशुवैद्यकाशी बोलून जनावरांवर योग्य वेळी उपचार सुरू करा.