ज्ञानवापी मशीद प्रकरण ; ज्ञानवापी मशीद माहिती

Gnanwapi Masjid case; Gnanwapi Masjid Information: ज्ञानवापी-श्रृंगार गौरी प्रकरणात बुधवारी वाराणसी जिल्हा न्यायालयात हिंदू बाजू आपला युक्तिवाद सुरू ठेवणार आहे. मंगळवारी मुस्लीम पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला. एप्रिलमध्ये, वाराणसीच्या दिवाणी न्यायाधीशांच्या न्यायालयाने ज्ञानवापी मशीद-श्रींगार गौरी संकुलाचे व्हिडिओग्राफी सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. मे महिन्यात सर्वेक्षणाचे काम संपले आणि त्याच महिन्यात अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला.
ज्ञानवापी मशीद बनारस, उत्तर प्रदेश, भारत येथे आहे. १६६९ मध्ये जुने शिवमंदिर पाडून औरंगजेबाने ते बांधले होते. ज्ञानवापी मशीद ही सध्याच्या काशी विश्वनाथ मंदिराला लागूनच आहे. या मशीदीचे नाव संस्कृत असून त्याचा अर्थ ज्ञानाचा तलाव किंवा ज्ञान कुंड असा होतो. ज्ञान+वापि, संस्कृत मध्ये वापि म्हणजे तलाव.
काशी विश्वनाथ मंदिर आणि त्याला लागूनच असलेली ज्ञानवापी मशीद ही कोणी व कधी बांधली याबद्दल अनेक समजुती आहेत. पण ठोस स्वरूपाची ऐतिहासिक माहिती बरीच कमी आहे. सर्वसाधारणपणे असं समजलं जातं की काशी विश्वनाथ मंदिर औरंगजेबाने तोडलं होतं आणि तिथे मशीद बांधली होती.