Karjat : ‘अन्न प्रक्रिया प्रक्रिया उद्योग’सुरु करण्याची सुवर्णसंधी , मिळतेय ३५ टक्क्यांपर्यंत अनुदान , जाणून घ्या कुठे करायचा अर्ज !
Golden opportunity to start 'Food Processing Industry', get up to 35% subsidy, find out where to apply!

Ahmednagar : अन्न प्रक्रिया प्रक्रिया उद्योग (Food Processing Industry) उभारण्यासाठी अन् ३५ टक्क्यांपर्यंत अनुदान (35% subsidy) मिळवा योजना ; अर्ज भरण्यासाठी कृषी विभागा (Department of Agriculture)ला भेट द्या असे आवाहन कर्जत चे तालुका कृषी अधिकारी (Taluka Agriculture Officer of Karjat) पद्मनाभ म्हस्के यांनी केलं आहे .
बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा , त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा , तसेच शेतकऱ्यांना शेती संबंधित उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी प्रोत्साहन आणि पाठबळ मिळावे , यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबविण्यात येत आहे . जिल्ह्यांना एक जिल्हा , एक उत्पादन अंतर्गत उत्पादन ठरवून दिले होते . नवे उद्योग सुरू करताना संबंधित उद्योग सुरू करण्याचे बंधन होते . त्यामुळे अन्य उद्योग सुरू करता येत नव्हते . हे बंधन शिथिल इच्छुक तरुणांना कोणताही नवा उद्योग सुरू करता येणार आहे . नगर जिल्ह्यासाठी एक जिल्हा एक उत्पादन या घटकांमध्ये दूग्धजन्य पदर्थ या व्यवसायाची निवड करण्यात आली होती . त्या क्षेत्रात तोच उद्योग सुरू करण्याचे बंधन होते . त्यामुळे नव्याने उद्योग सुरू करण्यात काही प्रमाणात अडथळे येत होते . हा अडथळा आता शिथिल झाला आहे . प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत नाशवंत कृषिमाल , कडधान्य , तेलबिया , मसाला पिके , मांस अन्नधान्य , प्रक्रिया , मस्त्यव्यवसाय , कुक्कुटपालन , दुग्धव्यवसाय , किरकोळ वने उत्पादन आदींचा समावेश झाला आहे .

आतापर्यंत कर्जत तालुक्यात प्रस्ताव ….
शहरी आणि ग्रामीण भागासाठी ही योजना असून , वैयक्तिक लाभार्थ्यांला ३५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते . लहान प्रक्रिया उद्योग सुरु करणे , आहे त्या उद्योगाचा विस्तार करण्यासाठी ही योजना आहे . या योजनेअंतर्गत तालुक्यात जवळपास ८० प्रस्ताव मंजुरी साठी पाठवले आहेत. तर आतापर्यंत चार लाभार्थी यांना ३० लाख कर्ज वाटप करण्यात आले आहे.बापूसाहेब होले
तंत्रज्ञान व्यवस्थापक
आत्मा कर्जत
काय आहेत या योजनेच्या अटी ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचा उद्योगावर मालकी अधिकार असावा . अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे व शिक्षण आठवी पास असावे . एका कुटुंबातील एकच व्यक्ती पात्र असेल . पात्र प्रकल्पांना किमतीच्या किमान १० ते ४० टक्के लाभार्थी हिस्सा देण्याची व उर्वरित बँक मुदती कर्ज घेण्याची तयारी असावी . या योजनेचा शेतकरी उत्पादक गट , कंपनी , संस्था स्वयंसहाय्यता गट , उत्पादक सहकारी संस्थाही लाभ घेऊ शकतात .
“स्थानिक अन्न प्रक्रिया उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागासाठी PMFME योजना सुरू केली आहे . या योजनेचा लाभ घेऊन आपला उद्योग सुरू करू शकतो . निकष शिथिल केल्याचा फायदा होणार आहे . ”
पद्मनाभ म्हस्के,
तालुका कृषी अधिकारी, कर्जत
राष्ट्रीय कृत बॅक सहकार्य करत नाहीत.
कर्जत तालुक्यातील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बडोदा बँक आदी राष्ट्रीय कृत बैका या सरकारी योजनेतून असणारे कर्ज प्रकरणे करत नाहीत. प्रतंप्रधान व मुख्यमंत्री व इतर शासकीय योजनेतून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार निर्मिती व्हावी यासाठी सरकार व प्रशासकीय अधिकारी नव नवीन योजनेतून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार निर्माण व्हावा या उद्देशाने कर्ज प्रकरणे मंजूर करतात परंतु राष्ट्रीय कृत बैका हे जाणून बुजून कोटा संपला कारणे देत कर्ज प्रकरणे करण्यास टाळाटाळ करतात अशा बँक सरकारने कारवाई करावी.
कृषी विभागाने सुरू केलेल्या प्रतंप्रधान सुक्ष्म अन्य प्रकिया उद्योगाला चालना देणार
कर्जत व श्रीगोंदा तालुक्यातील कृषी विभागाने आमच्या बँके कडे प्रतंप्रधान सुक्ष्म अन्य प्रक्रिया उद्योग नवीन व जुन्या उद्योगाला विस्तारीकरण करण्यासाठी सर्वतोपरी चालना मिळण्यासाठी एचडीएफसी बैक पूर्ण पणे सहकार्य करणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त गरजू व पात्र लाभार्थी यांनी याचा लाभ घ्यावा
निलेश राणे
एग्रीकल्चर मॅनेजर एचडीएफसी बँक श्रीगोंदा
आम्ही आमच्या गावात चालू करतो
[…] […]